शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

एक 'यादगार' मुलाकात ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला कोंढणपूर गावच्या माजी सरपंचाशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 12:45 PM

स्वामित्व योजनेच्या लोकार्पण समारंभाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद झाला.

पुणे (खेड शिवापुर) : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्यावर त्यांच्या आनंदाला आभाळ ठेंगणे झाले. महाराष्ट्रामधील स्वामित्व योजनेत समाविष्ट झालेल्या शंभर गावांमध्ये हवेली तालुक्यातील कोंढणपूर गावच्या माजी सरपंचाच्या बाबतीत 'हा' योग जुळून आला. 

स्वामित्व योजनेच्या अंतर्गत योजनेत समाविष्ट असलेल्या कोंढणपुर गावचे माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

स्वामित्व योजनेमुळे कोंढणपुर गावातील १४० कुटुंबांच्या गावठाण हद्दीतील जागेचे सर्वेक्षण ड्रोन द्वारे करण्यात आले असून गावातील 'डिजिटल मॅपिंग' चे कामही पूर्ण झाले आहे. त्याच बरोबर वाढत्या लोकसंख्या मुळे ग्रामीण भागात अनेक कुटुंब की गावठाण हद्दीबाहेर नव्याने घर बांधून राहत आहेत. अशावेळी गावठाण हद्दीच्या वाढीचा ही विचार व्हावा अशी मागणी यावेळी सरपंच मुजुमले यांनी पंतप्रधान यांच्याकडे केली. यावेळी आपली मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला कळवू अशी ग्वाही पंतप्रधान यांनी दिली, अशी माहिती विश्वनाथ मुजुमले यांनी लोकमत'शी बोलताना दिली.   

स्वामित्व योजनेच्या लोकार्पण समारंभाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद झाला. या चार मिनिटांच्या संवादामध्ये स्वामित्व योजनेबद्दल कोंढणपूर ग्रामस्थांची भूमिका विश्वनाथ मुजुमले यांनी पंतप्रधान यांना सांगितली. त्याचबरोबर या योजनेमध्ये लोकांमध्ये काय हवं आहे याच्याबद्दलची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.

विश्वनाथ मुजुमले म्हणाले, स्वामित्व योजनेमुळे कोंढणपुर गावातील १४० कुटुंबांच्या गावठाण हद्दीतील जागेचे सर्वेक्षण ड्रोन द्वारे करण्यात आले असून गावातील डिजिटल मॅपिंग चे कामही पूर्ण झाले आहे. त्याच बरोबर वाढत्या लोकसंख्या मुळे ग्रामीण भागात अनेक कुटुंब की गावठाण हद्दीबाहेर नव्याने घर बांधून राहत आहेत. अशावेळी गावठाण हद्दीच्या वाढीचा ही विचार व्हावा अशी मागणी यावेळी सरपंच मुजुमले यांनी पंतप्रधान यांच्याकडे केली. यावेळी आपली मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला कळवू अशी ग्वाही पंतप्रधान यांनी दिली.  

डिजिटल इंडिया या या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जमीन मालकांना यापुढे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्यात यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांच्या जमिनींचं डिजिटल पद्धतीने रेकॉर्ड तयार करून डिजिटल पद्धतीने जमिनीच्या मोजणी होणार असून पूर्वीपासून ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भातील वाद-विवाद तंटे यापासून सुटका होणार आहे . आपल्या जागेची मालकी हक्काची इंहभूत माहिती या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड च्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याला जागामालकाला मिळावी. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यापूर्वी आपल्या जमीन वरती बँका व इतर वित्तीय संस्था कर्ज देण्यामध्ये टाळाटाळ करत होत्या. मात्र, आता यापुढे प्रॉपर्टी कार्ड असल्याकारणाने इतर वित्तीय सुविधाही घेण्यासाठी त्याला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. भारत सरकारच्या ई-ग्राम स्वराज्य पोर्टल साठी स्वामित्व योजना खूप मदतगार ठरणार आहे...... पंतप्रधानाशी बोलण्याचा योग आला त्यामुळे मी एकदम भारावून गेलो आहे. स्वामित्व योजनेमुळे भविष्यात शेतकऱ्यांमधील जागे संदर्भातील वाद-विवाद टळतील त्याचबरोबर गावच्या नियोजन बद्ध विकासाला एक नवीन दिशा मिळेल. श्री विश्वनाथ मुजुमले. माजी सरपंच, कोंढणपूर.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदी