सभासदांना एफआरपी रक्कम तीन टप्प्यांत देणार

By Admin | Updated: October 28, 2015 01:10 IST2015-10-28T01:10:18+5:302015-10-28T01:10:18+5:30

सभासदांची उर्वरित २४२ रुपये एफआरपी लवकरच देऊ. तसेच, पुढच्या वर्षीची एफआरपी तीन टप्प्यांत देऊ, हुद्देवारीबाबत कामगारांना योग्य न्याय देऊन कामगारांच्या बोनसबाबत कामगार प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे

Members will get the FRP amount in three phases | सभासदांना एफआरपी रक्कम तीन टप्प्यांत देणार

सभासदांना एफआरपी रक्कम तीन टप्प्यांत देणार

सोमेश्वरनगर : सभासदांची उर्वरित २४२ रुपये एफआरपी लवकरच देऊ. तसेच, पुढच्या वर्षीची एफआरपी तीन टप्प्यांत देऊ, हुद्देवारीबाबत कामगारांना योग्य न्याय देऊन कामगारांच्या बोनसबाबत कामगार प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. संचालक मंडळाने हंगाम चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही. मात्र, काही संचालकांनी पतसंस्थेचे कर्ज काढल्याच्या पुड्या सोडून सभासदांची दिशाभूल करीत आहेत, अशी टीकाही अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केली.
येथील सोमेश्वर कारखान्याच्या ५४व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ सभासद शिवाजीराव भोसले, रामचंद्र भगत, बी.जी. काकडे, शांताराम होळकर, विश्वासराव जगताप, वाहतूकदार दत्तात्रय सोरटे व ज्येष्ठ कामगार अशोक शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी अध्यक्ष जगताप बोलत होते. या वेळी नीरा मार्केट कमिटीचे सभापती नंदूकाका जगताप, दत्ताजी चव्हाण, रतनराव काकडे, जनार्दन फरांदे, विक्रम भोसले, तुकाराम जगताप, पोपटराव भोसले, सोमनाथ होळकर, बापूराव सूर्यवंशी, रघुनाथ भोसले, उपाध्यक्ष उत्तमराव धुमाळ, कार्यकारी संचालक सुरेश तावरे, संचालक नामदेवराव शिंगटे, लालासाहेब माळशिकारे, विशाल गायकवाड, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, महेश काकडे, ऋतुजा धुमाळ यांच्यासह सर्व संचालक, सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले, ऊसतोडणी संघटनांचा संप मिटला आहे. काही ऊसतोड कामगार कारखान्यावर दाखल झाले आहेत. १ तारखेपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालू होईल.
यावेळी कामगार नेते तुकाराम जगताप, भाऊसाहेब भोसले, रतनराव काकडे, शिवाजीराव भोसले, दत्ताजी चव्हाण, दिलीप पवार, राहुल चव्हाण, माऊली काकडे यांनी मनोगते
व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: Members will get the FRP amount in three phases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.