शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
4
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
5
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
6
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
7
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
8
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
9
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
10
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
11
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
12
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
13
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
14
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
15
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
16
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
17
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
18
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
19
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
20
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

पुण्यातील नगरसेवकांची संख्या वाढली; जाणून घ्या नवीन सदस्यसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 3:20 PM

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत न धरता, सद्य:स्थितीतील लोकसंख्या गृहीत धरून बुधवारी झालेल्या ...

पुणे:पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत न धरता, सद्य:स्थितीतील लोकसंख्या गृहीत धरून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे शहरातील नगरसेवक संख्या १७५ अंतिम करण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबतचे स्पष्ट आदेश अद्याप आले नसल्याने पुढील प्रभागरचना कशी असेल, किती प्रभाग तीनचे असतील व किती कमी संख्येचे हे अजून गुलदस्त्यात आहे. पुण्यात २०११ च्या जनगणनेनुसार ३५ लाख ५० हजार लोकसंख्या आहे व त्याप्रमाणे आजमितीला महापालिकेचे १६४ सदस्य होत आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पुणे महापालिकेची सदस्यांची संख्या १७५ पेक्षा जास्त -करता येत नाही.

दरम्यान, सद्य:स्थितीत असलेली लोकसंख्या विचारात घेऊन (१५ टक्के वाढ धरून) शहरातील नगरसेवक संख्या १७५ अंतिम करण्यात आली असल्याचे कळत आहे. जोपर्यंत ही  सदस्यसंख्या व किती प्रभाग करायचे निवडणूक आयोगाकडून आदेश येत नाही, तोपर्यंत शहरातील आगामी निवडणुकीची चित्र स्पष्ट होणार नाही, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अकरा सदस्यांची भर-

वाढलेल्या लोकसंख्येचा आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत अकरा नगरसेवकांची भर पडणार आहे. आता सदस्यसंख्या १३९ वर पोहोचणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०११च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार आराखडा तयार केला जात आहे.

शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यापैकी १३ लाख ५० हजार मतदार आहेत. यापूर्वी नगरसेवकांची संख्या १२८ होती. वाढलेल्या लोकसंख्येचा आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा आज राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. १२ ते २४ लाखांच्या लोकसंख्येसाठी १३९ नगरसेवक हे सूत्र असणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMaharashtraमहाराष्ट्र