पुणे : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी पत्ते उधळत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या २-३ कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. अशात आज राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणकडून मारहाण झालेले विजय घाडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी घाटगे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोकाटेंचा राजीनामा झाला नाही तर छावा आंदोलन करेल, मंगळवार पर्यंत आम्ही वाट बघणार आहोत, कोकाटे हा असंवेदनशील कृषिमंत्री आहे. राजीनामा दिला नाही तर मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा घाडगे यांनी दिला आहे.घाडगे यांनी बैठकीत अजित पवार यांना आम्हाला का मारलं? आमचं काय चुकलं? असा प्रश्नही विचारला यावर अजित पवारांनी मारहाणीच्या घटनेबाबत संताप व्यक्त केला ते म्हणाले, जी घटना घडली ती चुकीचीच आहे, महाराष्ट्रातील राजकारणात अस व्हायला नाही पाहिजे. या बैठकीत घाडगे यांनी आरोपीवर किरकोळ गुन्हे दाखल केले, सोडून दिले. अशी तक्रार केली असता अजित पवार लातूर पोलिसांशी बोलले, हे खपवून घेतलं जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. अजित पवारांना आम्ही भेटायला गेलो असताना आमचे मोबाईल बाहेर काढून घेतले होते, असेही घाडगे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. तत्पूर्वी, घाडगे यांनी मी मीडियाला घेतलयाशिवाय दादांना भेटणार नाही. मी लातूरला चाललो आहे. मी एकटा भेटायला येतो असे सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नाही. आता मी सरळ थेट लातूरला जात आहे. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.
काय आहे प्रकरण?छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी पत्ते उधळत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या २-३ कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटले. त्यादिवशी रात्री रोडवर छावाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे बॅनर फाडून जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी गस्त घातली. कुणीही कायदा हातात घेऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील होते.