शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मीरा सुरेश कलमाडी राजकारणाच्या उंबरठ्यावर; सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच राहणार उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 17:29 IST

शहर काँग्रेसचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी काँग्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्दे मीरा कलमाडी यांना उमेदवार म्हणून पुढे आणण्याची मोर्चेबांधणी काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञाच्या सांगतेचा मुहूर्त?

पुणे : शहर काँग्रेसचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी काँग्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञाच्या सांगतेचा मुहूर्त त्यासाठी त्यांनी निवडला आहे.इंदिरा गांधी व वसंतदादा पाटील यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संजय बालगुडे यांनी पुणे शहरात १०० ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प केला होता. त्यांची सांगता २९ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता टिळक रस्त्यावरील नितू मांडके सभागृहात होत आहे. मीरा कलमाडी या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये आहेत. शहरातील राजकीय पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात त्यांची ही संभाव्य उपस्थिती चर्चेचा विषय झाली आहे. सुरेश कलमाडी गेल्या काही वर्षापासून राजकीय विजनवासातच आहेत. काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तरीही त्यांचे राजकीय महत्त्व अद्याप अबाधित आहे. त्यामुळेच मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांची पुण्यात घरी जाऊन भेट घेतली होती. त्याच भेटीत मीरा कलमाडी यांना पुढे आणण्याचा विषय झाला असल्याचे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे.लोकसभेसाठी पुण्यात काँग्रेसकडे सध्यातरी बलाढ्य उमेदवार नाही. विश्वजीत कदम मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून अद्याप बाहेर आलेले नाहीत व पुण्यात त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच तीव्र विरोध आहे. त्यामुळेच मीरा कलमाडी यांना उमेदवार म्हणून पुढे आणण्याची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.बालगुडे यांनी सांगितले, की आपण त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले व त्यांनी स्वीकारले. त्यांच्याशिवाय आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड हेही कार्यक्रमात निमंत्रित आहेत. हे सगळेही काँग्रेसकडून सन २०१९ची लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवण्यास इच्छूक आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणेAshok Chavanअशोक चव्हाण