शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

राज्यातील वैद्यकीय अधिकारी एक दिवसीय संपावर, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 1:13 PM

रुग्णालयाबाहेर घोषणाबाजी करत छेडले आंदोलन

ठळक मुद्देनियमानुसार मागणी केल्याची सरकारने दाखल घ्यावी

पुणे: राज्यात सातवा वेतन आयोग लागू झाला असून त्याचा लाभ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाला नाही. स्वतःच्या जीवाची परवा न करता २४ कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी सहाव्या वेतन आयोगावरच काम करत आहेत. ही गेली काही वर्षांपासूनची मागणी सरकारने पूर्ण करावी. यासाठी त्यांच्याकडून एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. तर रुग्णालयाबाहेर लागू करा सातवा वेतन आयोग लागू करा. अशा घोषणा देत आंदोलन छेडण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आधीपत्याखालील महाविद्यालय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. कायमस्वरूपी सेवेवर घ्यावे आणि सातवा वेतन लागू करावा या प्रमुख मागण्या आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये यापूर्वी आंदोलन केलं होतं.  मात्र सरकारनं कोव्हीड संपल्याने दुर्लक्ष केलं. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते मात्र आमच्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिल्या आहेत. कोव्हीड काळात जर आंदोलन केले नाही तर सरकार दखल घेणार नाही अशी भूमिका या कंत्राटी डॉक्टरांनी घेतली आहे.   मागील काही वर्षांपासून मागण्या करत आहोत. तसेच पदांची मंजुरी असूनही आमची दाखल घेतली जात नाही. नियुक्त्या रखडवल्या जात आहेत. यावर आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. मागच्या वेळी केलेल्या संपाचे त्यांनी अजिबात मनावर घेतले नाही. सद्यस्थितीत सहाव्या वेतन आयोगानुसार प्रति महिना ७५ हजार देत आहेत. मात्र सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे अशी आमची मागणी आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

डॉ स्वप्ना यादव म्हणाल्या, आम्ही जीवाची परवा न करता रुग्णांना अखंडित सेवा देत आहोत. कित्येक वर्षांपासून आमच्या काही प्रलंबित मागण्या आहेत. पण त्याकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. आम्हाला सातवा वेतन आयोग आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेणे. अशा दोन मागण्या सद्यस्थितीत पूर्ण करून आमचा सन्मान करावा.............शासनाच्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातून अधिकरी सातव्या वेतन आयोगाची मागणी करत आहेत. आमचे सहकारी २४ तास काम करून अखंडित सेवा देतात. कोरोनाच्या काळात कुटुंबियांनाही आम्हाला सांभाळावे लागत आहे. आम्ही कोरोनाच्या काळातच आंदोलन करत नाहीये. त्याअगोदरही संप पुकारण्यात आला आहे. आम्ही नियमानुसार मागणी करत आहोत. तेवढी सरकारने पूर्ण करावी हीच अपेक्षा आहे.                                                                                                                                         डॉ गजानन भारती  

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार