Medha Patkar Alligation on Bill Gates: कोरोना ज्या वुहानच्या लॅबोरेटरीतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स; मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 06:38 PM2022-02-22T18:38:55+5:302022-02-22T18:58:45+5:30

Medha Patkar on Wuhan Lab Corona Bill Gates: मेधा पाटकर आज पुण्यात आल्या होत्या. आंतरराज्यीय मजूर स्थलांतर कायद्यासंदर्भात त्यांनी कामगार आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

Medha Patkar Alligation on Bill Gates: Bill Gates, owner of the Wuhan laboratory where Corona birth; Serious allegations of Medha Patkar in Pune | Medha Patkar Alligation on Bill Gates: कोरोना ज्या वुहानच्या लॅबोरेटरीतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स; मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

Medha Patkar Alligation on Bill Gates: कोरोना ज्या वुहानच्या लॅबोरेटरीतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स; मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

Next

पुणे : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यावर आज ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी गंभीर आरोप केला आहे. कोरोना ज्या वुहानच्या लॅबोरेटरीमधून निघाला, त्या लॅबोरेटरीचा मालक दुसरा कोणी नसून बिल गेट्स आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच बिल गेट्स फाऊंडेशनचे मनसुबे काय आहेत, यावर देखील त्यांनी गंभीर भाष्य केले आहे. 

मेधा पाटकर आज पुण्यात आल्या होत्या. आंतरराज्यीय मजूर स्थलांतर कायद्यासंदर्भात त्यांनी कामगार आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. साताऱ्यात या कामगारांना पहाटे तीन वाजता कामाला लावले जाते. त्यांच्या घरात लहान मुले असतात, तरी देखील त्यांच्या आयांना कामाला जुंपले जाते.  मुकादमाचं लायसन्स नाही, कामगारांना वेतन किती मिळतं? त्यांच्या हातात काही कागद मिळत नाही. त्यांना खोपटं आणि पालं यामध्ये राहावं लागतं. त्यांना किमान वेतन मिळत नाही, असे मेधा पाटकर म्हणाल्या. 



 

यानंतर कोरोना काळात मजुरांना घरी पायी चालत जावे लागल्याच्या मुद्द्यावर त्यांनी कोरोनाची उत्पत्ती ही बिल गेट्स यांच्या वुहान लॅबमध्ये झाल्याचा आरोप केला. याचबरोबर बिल गेट्सच्या फाऊंडेशनने अख्ख्या जगाची शेती ताब्यात घेण्याचा डाव आखला आहे. बिल गेट्स हा स्वतः 2 लाख 40 हजार एकरचा मालक आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दखल घेतली नाही म्हणून 1 हजार शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. आता तोमर यांनी बिल गेट्सना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे, असा गंभीर आरोप मेधा पाटकर यांनी केला. 
 

Web Title: Medha Patkar Alligation on Bill Gates: Bill Gates, owner of the Wuhan laboratory where Corona birth; Serious allegations of Medha Patkar in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.