शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मेधा कुलकर्णी यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:27 IST

टेकडीफोड करून बांधकामे होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांनी स्वत: वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली.

पुणे : शहरातील टेकड्यांची फोड होऊ नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील पुढाकार घेतला आहे. त्या पूर्वीपासूनच टेकड्या वाचविण्यासाठी सक्रिय आहेत. टेकडीफोड करून बांधकामे होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांनी स्वत: वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वारजे - कर्वेनगर क्षेत्रीय पुणे कार्यालयाचे विजय नाईकल, वनविभागाचे वनसंरक्षक दीपक पवार, मनोज बारबोले त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका वारजे कर्वेनगर पाणीपुरवठा विभागाचे संतोष लांजेकर, अतिक्रमण विभागाचे श्रीकृष्ण सोनार, संदिपान भागडे, कोथरूड वॉर्ड ऑफिसचे उपअभियंता संतोष गायकवाड उपस्थित होते.

कोथरूड येथील गोपीनाथ नगर, महात्मा सोसायटी, वनदेवी टेकडी या परिसरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. डुक्कर पाळणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने येथील पर्यावरण धोक्यात आले आहे. मोरांचे वास्तव्य असलेल्या या भागातील मोरांची व इतर पक्ष्यांची संख्या रोडावून कावळे व कबुतरांचे साम्राज्य पसरले आहे. राडारोडा टाकणाऱ्या गाड्या अवैधरित्या टेकडीवर येऊन राडारोडा टाकत आहेत. अनधिकृत बांधकामांना सर्रास पाणी व वीज जोडणी मिळत आहे. वनविभागाची भिंत तोडून आत येऊन अवैध पार्ट्यांना ऊत आला आहे. या सर्वांवर योग्य ते उपाय करावेत, अशा सूचना मेधा कुलकर्णी यांनी दिल्या.

मेधा कुलकर्णी या नेहमीच पुण्यातील टेकड्या या सुरक्षित राहायला हव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. टेकडीवर अतिक्रमणे होऊ नये किंवा विकासाच्या नावाखाली टेकडीला धक्का बसू नये यासाठी देखील त्या दक्ष असतात. त्यामुळेच त्यांनी वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रmedha kulkarniमेधा कुलकर्णीpollutionप्रदूषण