शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मेडद गाव बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:49 IST

आयुर्वेदिक महाविद्यालय काही दिवसांत पूर्ण होणार असल्याने या रस्त्याला महत्त्व आलेले आहे

बारामती : बारामती शहर दिवसेंदिवस बदलत आहे. मेडद गाव देखील बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत येणार आहे. पुढे आयुर्वेदिक महाविद्यालय काही दिवसांत पूर्ण होणार असल्याने या रस्त्याला महत्त्व आलेले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.मेडद येथे एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत ८३ रो-हाऊस , १७ नियोजित असलेल्या १०० रो-हाऊसचे भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेला मूलभूत गरजा आणि योजनांसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून चांगली घरे या ठिकाणी उभी राहणार आहेत. एकता ग्रुपच्या माध्यमातून शाळा, पतसंस्थेने घेतलेल्या भरारीप्रमाणे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, अशीही आशा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.प्रास्ताविक एकता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी केले. ते म्हणाले की, दोन वर्षांत गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून घरे तयार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करणार आहे. प्रत्येक कार्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. याही प्रकल्पाला बहुमूल्य सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रार्थना करून उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. बांधकामाचा आराखडा पाहून त्यामध्ये भविष्याचा विचार करून काही बदल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे परवेज सय्यद यांनी सांगितले.सूत्रसंचालन इम्तियाज तांबोळी यांनी, तर आभार सुभान कुरैशी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य मुस्लीम समाज व विशेषत: महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, बाजार समितीचे सभापती सुनील पवार, सचिव अरविंद जगताप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विक्रम भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, धनंजय जामदार, गृहनिर्माण संस्थेचे संचालक हाजी रशीद बागवान, आसिफ झारी, सौ. सलमा शेख, अकलाज सय्यद, रिजवान सय्यद, इम्रान मोमीन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारBaramatiबारामती