नणंदेने वहिनीचे तोंड, हात, पाय बांधून कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:55 IST2019-02-20T01:55:28+5:302019-02-20T01:55:50+5:30

याबाबत १९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

In the meanwhile, the face, hands and feet of the vessel tied up and collapsed | नणंदेने वहिनीचे तोंड, हात, पाय बांधून कोंडले

नणंदेने वहिनीचे तोंड, हात, पाय बांधून कोंडले

पुणे : कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने नणंदेने वहिणीचे हात पाय बांधून तिला घरात कोंडून ठेवल्याची घटना येरवडा येथील गणेश नगर परिसरात घडली. नणंद व तिच्यासह आलेल्या २ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत १९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला ही पती व सासू सासरे यांच्यासोबत गणेश नगर परिसरात राहण्यास आहेत. त्यांची नणंद रविवारी सायंकाळी घरी आली. तिच्यासोबत दोन अनोळखी व्यक्ती होत्या. तिची काही कागदपत्रे घरी आहेत. तिने वहिनीकडे त्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी तिने ते देण्यास नकार देत आई वडील आल्यावर घेऊन जा असे सांगितले.
 

Web Title: In the meanwhile, the face, hands and feet of the vessel tied up and collapsed