शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

Pune | वारजे भागात गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या गुंडावर मोक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 10:30 IST

इंगवले याच्याविरोधात लूट, खंडणी, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल...

पुणे : वारजे भागात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या गुंड कार्तिक इंगवले याच्यासह तीन साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी गेल्या महिनाभरात शहरातील सहा गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई केली आहे.

कार्तिक संजय इंगवले (वय २०), सनी बाळू शिंदे (वय २१), वैभव दत्तात्रय भाग्यवंत (वय २४, तिघे रा. रामनगर, बापुजीबुवा चौक, वारजे) अशी या गुंडांची नावे आहेत. या प्रकरणात एकाला अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. इंगवलेने गेल्या महिन्यात वारजे भागात एका दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील रोकड लुटली होती. दहशत माजविण्यासाठी त्याने पिस्तुलातून गोळीबार केला होता.

इंगवले याच्याविरोधात लूट, खंडणी, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावास डहाळे यांनी मंजुरी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMCOCA ACTमकोका कायदाWarje Malwadiवारजे माळवाडीPoliceपोलिस