शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची 'सोशल' सरशी; Twitter वर ठरले 'लखपती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 20:11 IST

मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु केला. त्यात फेसबुक, इन्स्टाग्रामचाही समावेश असला तरी, त्यांना ट्विटवर कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे.

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी ट्विटरवर एक लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. या टप्प्यासह मोहोळ भारताच्या महानगरातील महापौरांमध्ये ट्विटरवर (Twitter) सर्वाधिक लोकप्रिय महापौर झाले असून, त्यांना सर्वाधिक फॉलोअर्स असल्याची नोंद झाली आहे.

मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु केला. त्यात फेसबुक, इन्स्टाग्रामचाही समावेश असला तरी, त्यांना ट्विटवर कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे. विशेष म्हणजे पुण्यासह महापौर मोहोळ यांना देशभरातून सर्वपक्षीय फॉलोअर्स मिळाले आहेत. देशातील महानगरात महापौर मोहोळ सर्वाधिक लोकप्रिय असताना त्यांच्या पाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा क्रमांक आहे. मात्र त्यातही पेडणेकर यांच्यापेक्षा दुप्पट फॉलोअर्स मोहोळ यांना मिळाले असल्याची माहिती सहस्रजिथ क्रिएशन्सच्या सायली नलवडे यांनी दिली.

महापौरांमध्ये अधिक फॉलोअर्स असणारी शहरे 

१. पुणे: मुरलीधर मोहोळ :- १ लाख +२. मुंबई: किशोरी पेडणेकर :- ४९ हजार+३. हैदराबाद: विजयालक्ष्मी गडवाल :- २३ हजार+४. आग्रा: नवीनकुमार जैन :- ९ हजार +५. सुरत: हेमाली बोघावाला :- ८ हजार+६. अहमदाबाद : कीर्तीकुमार परमार :- ४ हजार+

नागरिकांकडून ट्विटवर नव्या कल्पना, सूचना, समस्या याची थेट माहिती मिळाली 

''महापौरपदाची जबाबदारी आल्यावर प्रत्यक्ष फिल्डवर काम करतानाच, समाज माध्यमाचा वापर करण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पुण्यासारख्या महानगराचे नेतृत्व करत असताना नागरिकांकडून ट्विटवर नव्या कल्पना, सूचना, समस्या याची थेट माहिती मिळत राहिली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आणि समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेला. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.'' 

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTwitterट्विटरSocialसामाजिक