शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

राज्यातील अनेक शहरात कमाल तापमान पोहचले चाळीशी पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 21:13 IST

राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक कमाल तापमान ४१.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे .

पुणे : राज्यात अवकाळी पावसाचे सावट दूर झाल्यानंतर हवामान कोरडे झाल्याने तापमानात मोठी वाढ झाली असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणचे कमाल तापमानाने चाळीशी पार केली आहे.

राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक कमाल तापमान ४१.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. सांताक्रुझ येथील कमाल तापमानही ४०.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते सरासरीच्या तुलनेत ७.७ अंश सेल्सिअसने अधिक आहे. 

कोकण, गोव्याच्या तुरळक भागात उष्णतेची तीव्र लाट होती. काही भागात कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकणातील काही भागात तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३८.१/१७.३, लोहगाव ३८.८/१९.८, जळगाव ४०.४/१५, कोल्हापूर ३८.२/२३.७, महाबळेश्वर ३२.१/१९, मालेगाव ३९.८/१७.४, नाशिक ३८.२/१६, सातारा ३८/२०.४, सोलापूर ४०.४/२२.६, मुंबई ३८/२५, सांताक्रुझ ४०.९/२२.२, रत्नागिरी ३६/२४.४, पणजी ३५/२७.२, डहाणु ३४.५/ २३.१, औरंगाबाद ३८.२/१९, परभणी ३९.५/२०.४, अकोला ४०.४/१७.५, बुलढाणा ३७.८/२०, चंद्रपूर ४१.२/२१, गोंदिया ३७.६/१९.२, नागपूर ३९/१८.३, वर्धा ३९.४/१९.९.

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानweatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र