शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू; आरोपी पळण्याच्या घटनेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:01 IST

महाराष्ट्रात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात दिसून येत आहे़. तर आरोपी पळून जाण्याच्या घटनेमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे़.

ठळक मुद्दे२०१६ मध्ये देशभरात पोलीस कोठडीतील मृत्यूच्या ६० घटनाउत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आरोपी पळून जाण्याचे प्रमाण, २८२ घटनांमध्ये ३२७ आरोपी गेले पळून

पुणे : पोलिसांच्या मारहाणीत सांगली येथील अनिकेत कोथळे याची हत्या प्रकरण ताजे असताना महाराष्ट्रात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात दिसून येत आहे़ त्याचबरोबर पोलिसांच्या ताब्यात आरोपी पळून जाण्याच्या घटनेमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे़ २०१६ मध्ये देशभरात पोलीस कोठडीतील मृत्यूच्या ६० घटना घडल्या़ त्यात एकट्या महाराष्ट्रात १२ घटना झाल्या होत्या़ त्या खालोखाल गुजरातमध्ये ९, मध्यप्रदेशमध्ये ५ पोलीस कोठडीत मृत्यू झाले होते़ महाराष्ट्रातील १२ घटनांपैकी ८ घटनांमध्ये आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे़ आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात नेताना अथवा पोलीस कोठडीत ठेवले असताना पळून जाण्याच्या घटनांमध्ये देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो़ सर्वाधिक आरोपी पळून जाण्याचे प्रमाण उत्तर प्रदेशमध्ये असून तेथे २८२ घटनांमध्ये ३२७ आरोपी पळून गेले होते़ त्यापाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये १११ घटनांमध्ये १३३ आरोपी पळाले होते़ त्यानंतर महाराष्ट्रात ९८ घटनांमध्ये ११८ आरोपी पळून गेले होते़ यामध्ये २१ आरोपी पोलीस लॉकअ‍ॅपमधून पळून गेले होते तर त्याव्यतिरिक्त ९७ आरोपी इतर ठिकाणाहून पळून गेले होते़ लॉकअ‍ॅपमधून पळून गेलेल्या सर्वांना पकडण्यात पोलिसांना यश आले तर, इतरांपैकी ७३ जणांना परत अटक करण्यात पोलीस यशस्वी झाले होते़ 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र