पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी 3 पोलीस कर्मचारी निलंबित

By admin | Published: January 17, 2017 09:14 PM2017-01-17T21:14:30+5:302017-01-17T21:14:30+5:30

कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या चेतन मनातकर याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता

3 police personnel suspended in police custody case | पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी 3 पोलीस कर्मचारी निलंबित

पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी 3 पोलीस कर्मचारी निलंबित

Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि.17 - कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या चेतन मनातकर याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता  पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी तीन पोलीस कर्मचाºयांना तडकाफडकी निलंबित केले. एमआयडीसीचे ठाणेदार शिरीष खंडारे यांची पोलीस मुख्यालयातील पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली. 
एमआयडीसी पोलिसांनी १२ जानेवारी रोजी दुचाकी चोरी प्रकरणात रॉबिन्सन बोर्डे व चेतन मनातकर यांना अटक केली. न्यायालयाने पोलीस कोठडीत त्यांची रवानगी केल्यानंतर त्यांना सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले. १४ जानेवारी रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या कोठडीतून एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी सलीम खान पठाण, रवी खंडारे, पंकज तायडे यांनी दोघांना बाहेर काढले आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. काही वेळानंतर आरोपी चेतन मनातकर याने लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला. पोलिसांनी त्याला स्वच्छतागृहात जाण्यासाठी सोडले; परंतु त्याच्यासोबत तिघा पोलीस कर्मचाºयांपैकी एकही पोलीस गेला नाही. हीच संधी पाहून आरोपी चेतनने स्वच्छतागृहात ठेवलेले कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर मंगळवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तैनात पोलीस कर्मचाºयांनी खबरदारी बाळगली असती, तर ही घटना घडली नसती; परंतु सलीम खान पठाण, रवी खंडारे व पंकज तायडे यांनी आरोपीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या तिघाही पोलीस कर्मचारी आणि ठाणेदार शिरीष खंडारे यांनी निष्काळजी केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 
 
शेती करणे आले अंगलट
ओसाड जमिनीचा उपयोग व्हावा, या उद्देशाने एमआयडीसी पोलिसांनी एक  एकर जागेत हरभरा व तुरीची लागवड केली. त्यावर फवारणीसाठी कीटकनाशक विषारी औषधे आणली होती. ही औषधे प्राशन करून चेतनने आत्महत्या केली. पण शेतीचा प्रयोग पोलीस ठाण्यात राबविणे एमआयडीसी पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले.
 
नातेवाईक म्हणतात, आमचे काही म्हणणे नाही
सर्वोपचार रुग्णालयात आलेल्या चेतन मनातकर याचे कुटुंबीय व त्याच्या चुलत भावाशी संपर्क साधला. पोलिसांवर तुमचा काही आरोप आहे का, असा प्रश्न विचारला असता, नातेवाइकांनी चेतनच्या मृत्यूबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. पोलिसांबद्दल आमचा रोष नसल्याचे सांगितले. 
 
पोलीस कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे तीन पोलीस कर्मचाºयांना निलंबित करण्यात आले असून, एमआयडीसीच्या ठाणेदाराची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. झालेली घटना दुर्दैवी आहे. 
 चंद्रकिशोर मीणा, जिल्हा पोलीस अधीक्षक,अकोला.

Web Title: 3 police personnel suspended in police custody case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.