शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
3
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
4
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
5
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
6
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
8
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
9
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
10
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
11
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
12
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
13
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
14
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
15
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
16
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
17
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
18
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
19
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
20
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
Daily Top 2Weekly Top 5

मावळचा ‘पॉवरफुल’ पराभव दादांच्या जिव्हारी, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत चक्रे फिरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:27 IST

मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये २१ उमेदवार रिंगणामध्ये होते....

- विश्वास मोरे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना ताकद असतानाही पराभवास सामोरे जावे लागले होते. तो पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला.

मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये २१ उमेदवार रिंगणामध्ये होते. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीतच खरी लढत झाली. अकरा उमेदवार अपक्ष होते. १३ लाख ६८ हजार ८७२ जणांनी अर्थात ६३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पिंपरी, चिंचवड, मावळ आणि पनवेलमधील मतदानाची टक्केवारी अधिक होती. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना ७ लाख २० हजार ६६३, राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५०, वंचित बहुजन पक्षाचे राजाराम पाटील यांना ७५ हजार ९०४ आणि बसपाचे संजय कानडे यांना १० हजार १९७ मते, तर नोटाला १५ हजार ७७९ मते मिळाली.

तरीही आले अपयश

श्रीरंग बारणे यांना मोदी नावाचा फायदा झाला. दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे, खासदार बारणे आणि भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील दहा वर्षाचा दुरावा कमी झाला. ही किमया घडविली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांनी हे मनोमिलन घडविले. त्याचाही काहीअंशी परिणाम बारणे यांच्या विजयावर जाणवला.

भाजपनेही घड्याळ चालविले

राष्ट्रवादीने प्रचाराचा नारळ पिंपरी-चिंचवड शहरातून फोडला होता. यावेळी शरद पवार यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. मात्र, त्यावेळी पार्थ पवार यांनी केलेल्या पहिल्या भाषणापासून मतदान होईपर्यंत अनेकवेळा त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. बारामतीचा खासदार हवा की, पिंपरीतील, असाही प्रचार झाला. राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेल्या पिंपरी आणि चिंचवडमधील नगरसेवकांनी युती धर्म न पाळता घड्याळ चालविले. पिंपरी, चिंचवड आणि मावळ, कर्जतमध्ये राष्ट्रवादीची ताकद होती. मात्र, अजित पवार यांनी ज्यांना महापौर, आमदार, स्थायी समिती सभापती अशी पदे दिली, त्यांनीच घात केला. पवार जोर लावूनही पार्थ यांना पराभवास सामोरे जावे लागले. हा पराभव पवार यांच्या जिव्हारी लागला.

टॅग्स :maval-pcमावळAjit Pawarअजित पवारshrirang barneश्रीरंग बारणेparth pawarपार्थ पवारsanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटीलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४