गादी कारखाना पेटला.. शेजारी गॅस एजन्सी .. स्थानिक तरुणांचा प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 06:12 PM2021-03-13T18:12:26+5:302021-03-13T18:17:39+5:30

मोठे नुकसान : स्थानिक नागरिक, पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आणली आग आटोक्यात.

Mattress shop near Gas agency catches fire in Sus Pune, citizens help to avoid mishap | गादी कारखाना पेटला.. शेजारी गॅस एजन्सी .. स्थानिक तरुणांचा प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

गादी कारखाना पेटला.. शेजारी गॅस एजन्सी .. स्थानिक तरुणांचा प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

Next

सुस येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एक गादी कारखाना तडे एक गॅरेज भासमसात झाले. हे घटना शनिवारी (दि १३) सकाली ११ वाजता घडली. स्थानिक तरुणांनी तातडीने टँकर बोलावत तसेच पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली. या घटनेत दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले.

सुस येथे ज्ञानेश्वर कृष्णा चांदेरे यांचे कुलस्वामिनी गादी कारखाना तसेच बाजूला एक गॅरेज आहे. शनिवारी ११ वाजता गादी कारखान्यात काम सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. कारखान्यात असलेल्या कापसमुळे आगीने लगेच उग्र रूप धारण केले. स्थानिक तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तातडीने दोन टँकर मागवले. दरम्यान, पाषाण येथील पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन केंद्रालाही ही माहिती देण्यात आली. थोड्याच वेळात पालिकेचा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. तासा भरानंतर ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. माजी सरपंच नारायण चांदेरे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची मदत केली. थोड्याच वेळात पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस हवालदार व्ही एल राठोड पुढील तपास करत आहेत.

चौकट

तर मोठी दुर्घटना झाली असती
गादी कारखान्याच्या शेजारी एच. पी. गॅस एजन्सी आहे. या ठिकाणी सिलेंडर असतात. मात्र स्थानिक तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सिलेंडर बाहेर काढले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
चौकट
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा

ही दोन्ही दुकाने गावातील मुख्य रस्त्या लगत आहेत. अचानक आग लागल्याने येथील वाहतूक खोळंबली. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस हवालदार व्ही एल राठोड आणि इतर पोलीस कर्मचारी आणि स्थानिक तरुणांनी वाहतूक सुरळीत केली.

- सुस येथे आगित भस्मसात झालेला गादी कारकाना आणि गॅरेज

सूस येथे आगीत दोन दुकाने भस्मसात
मोठे नुकसान : स्थानिक नागरिक, पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आणली आग आटोक्यात
 

Web Title: Mattress shop near Gas agency catches fire in Sus Pune, citizens help to avoid mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.