शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: गाव नकाशातील सर्व गाव रस्ते, पाणंद रस्त्यांचे होणार मजबुतीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 14:13 IST

राज्यात आतापर्यंत पालकमंत्री पाणंद रस्ते योजाना राबविण्यात येत होती. परंतु यासाठी स्वतंत्र निधी मात्र उपलब्ध करून दिला जात नव्हता...

सुषमा नेहरकर- शिंदे 

पुणे: राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृधी पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील गाव नकाशातील सर्व गाव रस्ते,  शेती व पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रथमच राज्य शासनाने केंद्र व राज्याच्या नरेगा योजनेतून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्यात आतापर्यंत पालकमंत्री पाणंद रस्ते योजाना राबविण्यात येत होती. परंतु यासाठी स्वतंत्र निधी मात्र उपलब्ध करून दिला जात नव्हता. यामुळेच महसूल विभागाकडून असे गाव, शेती, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून तात्पुरता मुरूम-माती टाकून रस्ते तयार करण्यात आले. परंतु यातील बहुतेक रस्त्यांवर अतिक्रमण झाले व रस्ते नादुरुस्त देखील झाले. यामुळेच शासनाने आता मातोश्री ग्रामसमृधी पाणंद रस्ते योजना आली आहे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती मार्फत कामाचे डिएसआर (दर निश्चित) करणे, डिझेल दल निश्चित करण्याचे काम केले जाणार आहे. 

याशिवाय यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. ग्रामसभेत गाव नकाशातील गाव, शेती व पाणंद रस्त्यांची नोंद घेणे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा मार्फत रस्त्यांचे आराखडे तयार करणे, तहसिलदारांनी अतिक्रमणे काढून टाकणे याची जबाबदारी व कालावधी निश्चित केला आहे. - प्रत्येक गावातील गाव, शेती व पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण होणार- प्रत्येक शेताला पाय, गाडी मार्ग तयार करण्याचे उद्दिष्ट - एकदा केलेला रस्ता पाच वर्षे पुन्हा करण्याची वेळ येऊ नये- सरकारी पैशाने मोजणीचे काम करणार प्रत्येक शेतक-यांच्या शेताला रस्ता- शासनाच्या मातोश्री ग्रामसमृधी पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमधील गाव नकाशावरील शेती, पाणंद, गाव रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यामुळे सर्व शेतक-यांच्या शेतीला रस्ता मिळणार असून, शेतक-यांच्या विकासासाठी याचा चांगला उपयोग होईल.- डाॅ.वनश्री लाभशेष्टीवार, उपजिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेRural Developmentग्रामीण विकासzpजिल्हा परिषदpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड