शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या मैदानात दिव्यांग जलतरणपटूचा ‘मास्टर स्ट्रोक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 19:01 IST

आव्हानांनाही अपार जिद्दीतून खणखणीत चपराक मारणारा अवलिया..

ठळक मुद्देब्रेस्टस्ट्रोक, फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय स्ट्रोक या स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक

पुणे : जगात प्रवेश केल्यानंतर वर्षभरातच सेरेब्रल पाल्सी या आजाराचे निदान झाले. दोन्ही पायाने चालता येईना. पण खचून न जाता आई-वडिलांनी व्यायाम म्हणून त्याला पोहण्यास शिकविले. यानेच त्याला उभारी दिली अन् चार ‘स्ट्रोक’मध्ये राष्ट्रीय पातळीवर त्याने सुवर्णपदक पटकावले. तर आता इयत्ता बारावीच्या निकालातही त्याने ८२ टक्के गुणांचा ‘मास्टर स्ट्रोक’ मारला आहे. तुषार नलावडे असे या दिव्यांग (पॅरा) जलतरुणपटूचे नाव आहे.पिंपरीतील कासारवाडी येथे तुषार आई-वडिलांसह राहतो. त्याच्यासाठी आई स्मिता यांनी नोकरी सोडली. तर वडील अभिजित हे खासगी कंपनीत उच्च पदावर आहेत. अनंत अडचणींचा सामना करत शिक्षण घेणाऱ्या तुषारला शिक्षणात चांगलीच गती आहे. इयत्ता दहावी तो ८७ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला होता. तर बारावीमध्ये विज्ञान शाखेत गणित व जीवशास्त्र हे दोन्ही विषय घेऊन ८२.०९ टक्के गुण मिळविले. त्याला आयआयटीमध्ये संगणकशास्त्र शाखेत पुढील शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी त्याने नुकतीच जेईई अ‍ॅडव्हान्स्ड ही परीक्षाही दिली आहे. तुषारचा जन्म झाल्यानंतर ११ व्या महिन्यातच त्याला सेरेब्रल पाल्सी हा आजार झाल्याचे निष्पण्ण झाले. दोन्ही हातात काठी घेतल्याशिवाय त्याला चालता येत नाही. त्यामुळे त्याच्या हालचालींवर खुप मर्यादा येतात. पण त्यावर मात करत तो दररोज महाविद्यालयात जात होता. त्याने जलतरणामध्येही प्राविण्य मिळविले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने ‘पॅरा गेम्स’मध्ये चमक दाखविली आहे. ब्रेस्टस्ट्रोक, फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय स्ट्रोक या चार स्ट्रोकमध्ये त्याला राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळाले आहे, असे तुषारच्या आईने सांगितले.------------ 

टॅग्स :PuneपुणेSwimmingपोहणेHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी