शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
2
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
3
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
4
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
5
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
6
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
7
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
8
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
9
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
10
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
11
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
12
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
13
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
14
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
15
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
16
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
17
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
19
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
20
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा

पुण्यात रंगली ‘मॅसिव्ह व्हाईब’ मैफल; आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपतर्फे ओशो रिसॉर्टमध्ये सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:00 PM

ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट येथे ‘मॅसिव्ह व्हाईब’ या आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपचा बहारदार कार्यक्रम झाला. क्वीन बी या अमेरिकन महिलेने काव्य-संगीत-नृत्याच्या माध्यमातून विश्वशांतीसाठी सुरू केलेल्या अभिनव मोहिमेचा भाग म्हणून ही मैफल सादर करण्यात आली.

ठळक मुद्देकाव्य-संगीत-नृत्याद्वारे जगातील दुष्कृत्यांबाबात जनजागृतीट्रम्पेट, चेलो, हार्मोनिका, की बोर्ड या वाद्यवृंदांबरोबर व गायनाद्वारे पोहोचवला संदेश

पुणे : ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट येथे ‘मॅसिव्ह व्हाईब’ या आंतरराष्ट्रीय म्युझिक ग्रुपचा बहारदार कार्यक्रम झाला. क्वीन बी या अमेरिकन महिलेने काव्य-संगीत-नृत्याच्या माध्यमातून विश्वशांतीसाठी सुरू केलेल्या अभिनव मोहिमेचा भाग म्हणून ही मैफल सादर करण्यात आली. शासन-प्रशासन किंवा अन्य संस्थांची वाट न पाहता प्रत्येकाने स्वत:मध्ये बदल घडवून आणावा. काव्य-संगीत-नृत्याद्वारे जगातील दुष्कृत्यांबाबात जनजागृती करण्यासाठी जगभर या मैफली आयोजित केल्या जातात. त्यासाठी या ग्रुपच्या तरुण कलावंतांनी जागतिक दौरा सुरू केला आहे. ट्रम्पेट, चेलो, हार्मोनिका, की बोर्ड या वाद्यवृंदांबरोबर व गायनाद्वारे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे हा संदेश रसिकांपर्यंत पोहोचवला. ‘शक्ती बनो’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. या मैफलीत गरीबी, पर्यावरणाची हानी, युद्ध, दहशतवाद इत्यादी दुर्घटनांची छायाचित्रे दाखवून हे दुष्प्रकार थांबवण्याचे आवाहन संगीत-नृत्याद्वारे केले गेले. ओशो मेडिटेशन रिसॉर्ट येथील सुमारे ४० देशांतून आलेल्या रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टॅग्स :Puneपुणे