सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे शिवशाहीसह 10 बस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:21 PM2019-03-20T12:21:57+5:302019-03-20T12:34:30+5:30

पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत शिवशाही बससह 10 खासगी गाड्या जळून खाक झाल्या.

massive fire breaks out in pune 10 buses burn | सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे शिवशाहीसह 10 बस जळून खाक

सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे शिवशाहीसह 10 बस जळून खाक

Next
ठळक मुद्देपुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी भीषण आग लागल्याची माहिती समोर आलीआगीत शिवशाही बससह 10 खासगी गाड्या जळून खाक झाल्या आहेत.आग नेमकी कशी लागली याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

पुणे -  पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीतशिवशाही बससह 10 खासगी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रोडवर शिंदेवाडी येथे बसचे बॉडी बांधण्याचे काम चालते. या गॅरेजमध्ये बुधवारी सकाळी अचानक आग लागली.

अग्निशमन दलाला सकाळी 10 वाजून 6 मिनिटांनी याची माहिती मिळताच तातडीने 2 फायरगाड्या, 2 वॉटर ब्रॉऊझर घटनास्थळी रवाना झाले. ज्वलनशील पदार्थ या ठिकाणी असल्याने आगीने पटकन पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांना सव्वा अकरा वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत शिवशाही बससह 8 ते 10 बस पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. याशिवाय तेथील आणखी काही बसना आगीची झळ पोहचली आहे. आता आग पूर्णपणे विझली असून कुलिंगचे काम सध्या सुरू आहे. आग नेमकी कशी लागली याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. 

Web Title: massive fire breaks out in pune 10 buses burn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.