निगडी - पिंपरी-चिंचवडमधील रुपीनगर मुख्य रस्त्यावरील स्वामी समर्थ मार्केट परिसरात रविवारी (१५ मार्च) दुपारी भीषण आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. भंगाराच्या गोदामात लागलेल्या या आगीने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास गोदामातून अचानक धूर आणि ज्वाळा उसळताना दिसल्या. गोदामात मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य साठवून ठेवलेले असल्याने आग वेगाने पसरली. सुरुवातीला दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते; मात्र आगीची तीव्रता वाढत असल्याने आणखी चार बंब तातडीने बोलावण्यात आले. आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे मोठे ढग पसरले होते. दूरवरूनही ज्वाळा आणि धूर स्पष्ट दिसत असल्याने स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.गोदामाच्या मागील बाजूस असलेल्या वाहन पार्किंगमध्ये उभी असलेली एक खासगी बस आगीच्या विळख्यात सापडून पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र अग्निशमन दलाने तत्परता दाखवत इतर वाहने वेळेत सुरक्षितस्थळी हलवली, त्यामुळे मोठे नुकसान टळले. दरम्यान, चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी परिसरात बंदोबस्त ठेवत नागरिकांना सुरक्षित अंतरावर थांबवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे.
Web Summary : A massive fire engulfed Swami Samarth Market in Rupinagar, Pimpri-Chinchwad, destroying a scrap warehouse and a bus on Sunday. Six fire engines controlled the blaze, preventing further damage. No casualties were reported; the cause is under investigation.
Web Summary : पिंपरी-चिंचवड के रूपनगर में स्वामी समर्थ मार्केट में भीषण आग लग गई, जिससे एक कबाड़ गोदाम और एक बस नष्ट हो गई। छह दमकल गाड़ियों ने आग पर काबू पाया और आगे नुकसान को रोका। कोई हताहत नहीं हुआ; कारण की जांच चल रही है।