शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला संपविले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 16:57 IST

पतीवर कर्ज झाल्यामुळे मोरे कुटूंबीय माया यांना माहेरहून पन्नास हजार रुपये आणावे अशी सतत मागणी करण्यात येत होती.

ठळक मुद्देयाप्रकरणी तिच्या पतीसह सासू सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल

लोणी काळभोर : पतीने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरकडून ५० हजार रुपये आणावेत याकरीता सासरी होणारा शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्यामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना कोरेगावमुळ ( ता. हवेली ) येथे घडली.याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह सासू व दिर या तिघांना अटक केली आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रकाश सोपान बेलुसे (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे.       माया शरद मोरे (वय.२५ रा.कोरेगाव मूळ ता.हवेली ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे भाऊ बेलुसे( वय २८, रा. पाटस, पळसे पुर्नवसन, ता. दौंड, ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माया हिचे पती शरद भिवा मोरे (वय.३० ), दिर भरत भिवा मोरे ( वय ३३ ) व सासू श्रीमती जनाबाई भिवा मोरे (वय.६०, तिघे रा.दासवे वस्ती, कोरेगांवमुळ, ता. हवेली ) या तिघांना अटक केली आहे.     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दासवे वस्तीवर माया शरद मोरे ही आपल्या पती शरद भिवा मोरे ,सासू ,सासरे आणि दिरासह सहकुटूंब राहत होती. माया व शरद मोरे यांचा विवाह ३० मे २०१२ रोजी झाला. शरद हा जमीन खरेदी - विक्री करतो. तर त्याचा मोठा भाऊ भरत याचे कपड्यांचे दुकान आहे. लग्नानंतर एक वर्षांनी शरद व माया यांना मुलगी झाली. आॅगस्ट २०१० मध्ये माया हिने आपला भाऊ प्रकाश यांस फोन केला व पती शरद याच्यावर खूप कर्ज झाले असून ते फेडण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आण असे पती, सासू, दिर व जाऊ सांगत तिला शिवीगाळ मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ करत होते. तिने सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतू त्यांनी ऐकले नाही. तिचा छळ चालूच राहिल्याने तिने भावाशी संपर्क साधला व जगणे असह्य झाले असल्याचे सांगितले. भावाने तिला असा विचार करू नकोस असे सांगितले. २३ मार्च रोजी तिने पुन्हा माहेरी संपर्क साधला व पैश्याच्या कारणांमुळे त्रास होत असल्याचे सांगितले. त्यावेळीही तिला समजावून सांगितले. अखेर तिला होणारा शारिरीक व मानसिक छळ असह्य झालेने २४ मार्च रोजी दुपारी आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरी अडकवून गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेचा तपास उरुळी कांचन दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्यासह सचिन पवार, सोमनाथ चित्तारे, शशिकांत पवार हे करत आहे 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाDeathमृत्यूPoliceपोलिसuruli kanchanउरुळी कांचन