शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्या नवविवाहितेवर सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 17:39 IST

शिर्सूफळ  येथील घटना : अवघ्या महिनाभरापूर्वीच झाला होता विवाह..

ठळक मुद्देसंतप्त माहेरच्यांनी घर पेटवत पती, सासू, नणंन यांना केला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. 

सांगवी : अवघ्या महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहितेने सासरच्या छळास कंटाळून किटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे.  शिर्सूफळ (ता.बारामती) येथे ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. २०) घडली. कोमल सचिन आटोळे (वय २३) असे या दुर्दैवी तरूणीचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी कोमलचे अंत्यसंस्कार पतीच्या बंगल्यासमोर केले. तसेच सासरचे घर पेटवून देत पती, सासू, नणंन यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत  बारामती तालुका पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.सासू बकुळाबाई कोंडीराम आटोळे, पती सचिन कोंडीराम आटोळे (दोघे रा. शिर्सूफळ, ता. बारामती), नणंन नंदाबाई नवनाथ शिंगाडे (रा. शेळगाव, ता. इंदापूर) यांच्यावर आत्महत्येप्रकरणी तर कोमलचे वडील  प्रकाश जयसिंग गावडे,  आई मंगल प्रकाश गावडे, भाऊ सागर प्रकाश गावडे, विशाल हरिभाऊ गावडे, विकास हरिभाऊ गावडे, सागर गावडे, संतोष गावडे (सर्व रा. पारवडी, ता. बारामती) यांच्यावर  घर पेटवून दिल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या महिनाभरापूर्वीच विवाह झालेल्या कोेमल हिचा बकुळाबाई कोंडीराम आटोळे, सचिन कोंडीराम आटोळे, नंदाबाई नवनाथ शिंगाडे, यांनी लग्न झाल्यानंतर  वेळोवेळी टीव्ही, सोन्याची अंगठी, मोबाइलची मागणी करून नंतर  कारसाठी माहेरून दीड लाख रूपयांची मागणी केली. या कारणावरून कोमलचा वारंवार शारीरिक मानसिक त्रास दिला.  या  छळास कंटाळून  शनिवारी (दि.२०) कोमलने कीटकनाशक पिले.  रविवारी (दि. २१) पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर कोमलच्या सासरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (दि.२१)  रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या  सुमारास  शिर्सुफळ  येथे फिर्यादी आटोळे यांची पत्नी कोमल हिने घरात खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक औषध पिल्याने उपचारासाठी तीला बारामती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी पहाटे पाऊणेपाच वाजण्याच्या  सुमारास कोमलचा मृत झाला. त्यानंतर  रुई ग्रामीण रुग्णालयात तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह माहेरच्या व्यक्तींना देण्यात आला.  त्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी  शिर्सूफळ  येथे घेऊन गेल्यानंतर  प्रकाश जयसिंग गावडे, मंगल प्रकाश गावडे, सागर प्रकाश गावडे, विशाल हरिभाऊ गावडे, विकास हरिभाऊ गावडे, सागर गावडे,संतोष गावडे व इतर अज्ञात २० ते २५ ते इसमानी फिर्यादी आटोळे  यांना तुम्हीच मुलगी मारली म्हणून शिवीगाळ करून  कोमलच्या मृतदेहावर आटोळी यांच्या राहत्या बंगल्याच्या आवारातच अंत्यसंस्कार केले. त्यानंतर कोमलच्या माहेरच्या लोकांनी आटोळे यांच्या  घरात  घुसून घरातील संपूर्ण सामान जाळण्यास सुरुवात केली.  आटोळे कुटुंबीयांच्या अंगावर जाऊन त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या पासून स्वत:ला वाचवत आटोळी कुटुंबीय घरातून पळून गेले. यानंतर गावडे कुटुंबीयांनी आटोळे यांचे संपूर्ण घर पेटवीले. या घटनेत  घरातील संपूर्ण सामान,  रोख रक्कम, व  सोन्याचांदीचे दागिने असे मिळून सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे, असे कोमलचा पती सचिन आटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक बाळासो जाधव हे अधिक तपास करीत आहेत. ——————————— 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू