Pune : सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेच्या आत्महत्या; बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: April 29, 2023 16:50 IST2023-04-29T16:45:13+5:302023-04-29T16:50:02+5:30

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सासूवर गुन्हा दाखल केला आहे....

Married woman ended life due to torture by mother-in-law; A case was registered at Bundagarden Police Station | Pune : सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेच्या आत्महत्या; बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Pune : सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेच्या आत्महत्या; बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : विवाहितेचा मानसिक छळ करुन तिला जगणे नकोसे केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सासूवर गुन्हा दाखल केला आहे.

नागम्मा चन्नाप्पा कांबळे (वय ५०, रा. ताडीवाला रोड) असे या सासूचे नाव आहे. राजश्री कांबळे (वय २५, रा. ताडीवाला रोड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी शकुंतला शिरसैल दिड्डीमणी (वय ५०, रा. कृष्णानगर, महमदवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ताडीवाला रोडवरील दुष्काळ झोपडपट्टीत ११ डिसेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी राजश्री कांबळे हिची सासू किरकोह कारणावरुन वारंवार त्रास देऊन घालून पाडून बोलत असे. तिचा मानसिक छळ करुन तिचे जगणे नकोसे केले होते. फिर्यादी यांच्या मुलीने शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कोळेकर तपास करीत आहेत.

Web Title: Married woman ended life due to torture by mother-in-law; A case was registered at Bundagarden Police Station