शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगामुळे विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: January 25, 2017 02:12 IST

सासरकडील नातेवाइकाने लगट करण्याच्या बहाण्याने जवळ येऊन विनयभंग केल्याच्या कारणावरून व सासरच्या मंडळींकडून

पुणे : सासरकडील नातेवाइकाने लगट करण्याच्या बहाण्याने जवळ येऊन विनयभंग केल्याच्या कारणावरून व सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरुड येथील डहाणूकर कॉलनी येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी पती, सासू आणि नणंदेचा पती या तिघांना अटक केली आहे. अर्चना ऊर्फ काजल विनोद ढवारे असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर नणंदेचा पती हणुमंत सोनवणे , सासू सरस्वती ढवारे आणि पती विनोद राम ढवारे या तिघांना अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अर्चनाची आई आशाबाई राजू आदमाने (वय ४६, रा़ वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. अर्चना उर्फ काजल ढवारे हिचे डिसेंबर २०१५मध्ये विनोद ढवारे याच्याशी लग्न झाले होते. विनोद ढवारे हा व्यवसायाने चालक आहे. तो डहाणूकर कॉलनीच्या लक्ष्मीनगर परिसरात राहण्यास आहे. तेथेच जवळ त्याची बहीण आणि तिचा पती हनुमंत सोनवणे राहतात. हनुमंत हादेखील व्यवसायाने चालक आहे. जवळच राहण्यास असल्याने त्याचे घरी येणे-जाणे असायचे. मात्र लग्न झाल्यापासून काजलची सासू व पती विनोद दोघे तिला स्वयंपाक नीट येत नाही म्हणून टोचून बोलत तसेच तिला शेळ्या चारण्यासाठी जबरदस्तीने बाहेर पाठवत होते. तिला माहेरीदेखील पाठवत नव्हते. दरम्यान सोनवणे याचे घरी येणे जाणे असायचे. तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. त्याने हा प्रकार वारंवार केला. काजलने हा प्रकार तिच्या पतीलाही सांगितला. मात्र सोनवणे याने एके दिवशी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा विनयभंग केला. पती, सासू यांच्याकडून वारंवार होणारा त्रास आणि नणंदेच्या पतीने लगट करण्यासाठी केलेला विनयभंग या त्रासाला कंटाळून शेवटी तिने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. (प्रतिनिधी)