Marathi should be the language of knowledge: Adv. Devendra Butte Patil | मराठी ज्ञानभाषा व्हावी : ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील

मराठी ज्ञानभाषा व्हावी : ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘मोकळे आकाश’ या ई- विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. या वेळी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, डॉ. एस. बी. पाटील, प्रा. ए. जी. कुलकर्णी, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते. ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील म्हणाले, की मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी इंग्रजीप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, दळणवळण आणि कायद्याची भाषा म्हणून विकसित व्हायला हवी.

ते म्हणाले, भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम असून प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा. उत्तम मराठी भाषा लिहिता-वाचता येणे हे आनंददायी असते. मराठी भाषा समृद्ध असून मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेतील साहित्यानुभव प्रत्येक मराठी जनाने घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी शिक्षण पद्धतीतून बाहेर पडून ज्ञानात्मक, गुणात्मक स्तर उंचविण्यासाठी स्वयं अध्ययनाला महत्त्व देऊन उपक्रमशीलता वाढवायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दि.२५ रोजी कुसुमाग्रजांच्या कवितांचा ‘काव्यजागर’, दि. २६ रोजी डॉ. संजय शिंदे यांचे ‘समाजमाध्यमांतून मराठीचा प्रचार व प्रसार’ या विषयावर व्याख्यान तर दि.२७ रोजी प्रा. साईनाथ पाचारणे यांनी लेखन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय शिंदे यांनी तर आभार डॉ. बाळासाहेब अनुसे यांनी मानले.

फोटो ओळ: मराठी भाषा दिनानिमित्त ‘मोकळे आकाश’ या विशेषांकाचे प्रकाशन करताना संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, नानासाहेब टाकळकर व इतर.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Marathi should be the language of knowledge: Adv. Devendra Butte Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.