शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेपेक्षा मराठी अभिनयाची बाजू उत्कृष्ट - महेश मांजरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 16:59 IST

'इथे रंगभूमीशी जोडलेले कलाकार असल्याने अभिनयाची बाजूही मराठीकडे उत्कृष्ट' अशी स्पष्ट भूमिका अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.

पुणे : ‘‘दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीविषयी अनेक मिथके पसरली आहेत. ते व्यावसायिक जरूर आहेत, पण मराठीमध्ये आशयाची समृद्धी सर्वाधिक जाणवते. इथे रंगभूमीशी जोडलेले कलाकार असल्याने अभिनयाची बाजूही मराठीकडे उत्कृष्ट आहे. पण, ३ कोटी रुपयांत चित्रपट हा प्रकार मराठी निर्मात्यांनी बाजूला ठेवला पाहिजे आणि किमान ५० कोटींच्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटाचे स्वप्न पाहून ते साकारले पाहिजे. मराठी चित्रपट देशभर प्रदर्शित केला पाहिजे आणि प्रमोशनसाठी मोठे बजेट ठेवले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.दकनी अदब फाऊंडेशन आयोजित पाचव्या डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन शनिवारी (दि.१६) ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी राहुल रंजन महिवाल व अस्लम हसन, डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या आयोजिका मोनिका सिंग, जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर, युवराज शाह, शाहीर सुरेश वैराळकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी व कवी राहुल रंजन महिवाल यांच्या ‘जश्न ए दिवानगी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. उद्घाटनानंतर मांजरेकर यांची मुलाखत झाली.मांजरेकर म्हणाले, देशातील इतर कुठल्याही चित्रपटसृष्टीपेक्षा मराठी चित्रपटसृष्टी अधिक संघटित आणि सुव्यवस्थित आहे. त्यामुळे बदलत्या काळात मराठी चित्रपटांनी तीन कोटींमध्येच अनेक चित्रपट करण्यापेक्षा, मोठ्या बजेटच्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटांचे ध्येय ठेवावे.’’मोनिका सिंग प्रास्ताविकात म्हणाल्या, “डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलने अल्पावधीत साहित्यप्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले आहे. हा साहित्य महोत्सव अधिकाधिक आशयसंपन्न करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. लेखक आणि वाचकांमध्ये नाते जोडण्याचा आमचा उद्देश आहे.”

साहित्य मानवी सुख-दुःखाचे, वेदनांचे, सोसण्याचे दर्शन घडवते. धर्म, राजकीय आणि अर्थसत्ता, यामुळे समाजात दुःख निर्माण होतात. अशा मानवी दुःखाचा अन्वयार्थ साहित्य शोधते, त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी वाचनसंस्कृती जोपासली पाहिजे. डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून भाषांमधील सेतू जोडण्याचे आणि साहित्यसंवर्धनाचे कार्य होत आहे.- लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMahesh Manjrekarमहेश मांजरेकर Marathi Movieमराठी चित्रपट