शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : ...तर मग मी आणि प्रकाश आंबेडकर का नाही एकत्र येऊ शकत ? संभाजीराजेंनी उलगडलं भेटीमागचं 'राज'कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 18:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावी अशी इच्छा होती. 

पुणे : प्रकाश आंबेडकर यांना खूप दिवसांपासून भेटायचं होते. त्याच्या पाठीमागचे महत्वाचे कारण म्हणजे जातीय विषमता कमी करता येईल, बहुजन समाज एका छताखाली राहील हे आहे. त्याचसह मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हा भेटीचा जुळून आला आहे. आणि जर शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र येऊ शकतात तर मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येऊ नाही शकत? असा सवाल करत संभाजीराजेंनी उपस्थित करत या भेटीमागचं 'राज'कारण सांगितले. 

पुण्यात खासदार संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? तसेच शाहू महाराज यांनी सुरुवातीला बहुजन समाजाला आरक्षण दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावी अशी इच्छा होती.   

मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही : प्रकाश आंबेडकर 

मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा आणण्याची आवश्यकता आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच ताजेपणा येईल असे मत वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. 

आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी  मराठा आरक्षणासाठी आता दोनच कायदेशीरपर्याय आहेत.त्यातला पहिला पर्याय म्हणजे न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि दुसरा ही याचिका जर फेटाळली गेली तर दुसरी याचिका दाखल करणे. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.

संभाजीराजेंकडून विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी सुरु... मराठा आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजे हे शनिवारी ( दि. २९ ) वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी पुण्यात आले होते.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारण