शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्यापुढे हतबल होऊन सरकारने ओबीसी आरक्षण संपवले; लक्ष्मण हाकेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:50 IST

प्रा. लक्ष्मण हाके: ज्येष्ठ नेते शरद पवार,मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावरही टीका

पुणे सरकारने मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपवले, अशी टीका ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली. मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष, मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावरही त्यांनी टीका केली व सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले.समाजमाध्यमावर एक पोस्ट व्हायरल करत प्रा. हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलन समाप्तीवर जोरदार टीका केली. हा निर्णय ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा गळा घोटणारा निर्णय आहे. गावोगावी तपासणी होऊन आता आरक्षण दिले जाईल, असे सांगितले गेले. प्रमाणपत्र देताना कसलीही तपासणी केली जाणार नाही. यातून ओबीसी समाजाच्या आरक्षणावर संक्रांत येत आहे. असे ते म्हणाले. मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष असलेले व हा निर्णय जाहीर करणारे मंत्री राधाकृष्ण विखे यांना त्यांच्या जिल्ह्यातीलही माहिती नाही. तिथे किती ओबीसी, किती मराठे, किती कुणबी आहेत हे त्यांनी सांगावे. कसलाही अभ्यास नसताना व कोणतीही माहिती न घेता सरकारने हा निर्णय घेतला. याचे कारण म्हणजे आंदोलनापुढे ते हतबल झाले होते,” असा आरोप प्रा. हाके यांनी केला.सरकारने मंगळवारी आंदोलन समाप्त करताना जाहीर केलेला अध्यादेश संपूर्णपणे बेकायदेशीर आहे, अशी टीका प्रा. हाके यांनी केली. “गावगाड्यातील ओबीसी समाज तसेच अन्य प्रवर्गातील जाती-जमातींमधील सर्वांच्याच आरक्षणाचा घोट सरकारी अध्यादेशाने घेतला आहे. असे म्हणत प्रा. हाके यांनी अध्यादेश वाचून दाखवला. त्यातील अनेक शब्दांना त्यांनी हरकत घेतली. त्याचा अर्थ लावताना त्यांनी यातून ओबीसी समाजाच्या आरक्षणावर टाच येणार असल्याचे सांगितले.

 या अध्यादेशामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सरकारने सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानच त्यांनी सरकारला दिले. मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या कामात सुलभता यावी, यासाठी हा अध्यादेश आहे असे त्यात म्हटले आहे. त्याचा अर्थ काय, ते त्यांनी महाराष्ट्राला समजावून सांगावे. उपसमितीत ओबीसी समाजाची माहिती असलेला एकही माणूस नव्हता. विखे यांचा या विषयाचा काहीही अभ्यास नाही. राज्यातील ओबीसी समाजाची विस्ताराने माहिती असणारे समितीत कोणीही नाही. त्यामुळे समितीच पक्षपाती आहे. असेही ते म्हणाले. सरकारच्या या अध्यादेशाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत. असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Reservationमराठा आरक्षण