शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Video : मुंबईत मराठा बांधव उपाशी राहू नयेत;अमित ठाकरे यांचं सरकारला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:00 IST

- मुंबईत आलेल्या मराठा बांधवांपर्यंत अन्न व पाणी पोहोचले पाहिजे, हे सरकारचे कर्तव्य आहे. ते पुढे म्हणाले, सरकारने आंदोलनाकडे गांभीर्याने पाहावे.

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पत्नी व मुलासह पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना करून  सगळ्यांचे भलं होऊ दे असे साकडे घातले. यानंतर  माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. विशेषतः सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.अमित ठाकरे म्हणाले, आमची भूमिका बदललेली नाही. जरांगे यावेळी परत आले आहेत, तर त्यांना आधी दिलेली आश्वासने कोणाने दिली होती, ती पाळली का ? हा प्रश्न आहे. जनतेला फसवले जात आहे का ? हे लोकांनी विचारायला हवे. आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे. मात्र, मुंबईत आलेल्या मराठा बांधवांपर्यंत अन्न व पाणी पोहोचले पाहिजे, हे सरकारचे कर्तव्य आहे. ते पुढे म्हणाले, सरकारने आंदोलनाकडे गांभीर्याने पाहावे. काही तरी मार्ग काढून लवकर तोडगा काढावा. मराठा बांधव ज्या मागण्या करत आहेत, त्या तांत्रिकदृष्ट्या शक्य आहेत का, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. आरक्षण मिळाले तर शिक्षण व रोजगार क्षेत्रात त्याचा कसा फायदा होईल, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. असेही ते म्हणाले.  फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुंबईत काही अनुचित घडावे, असे त्यांनाही वाटत नाही. योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि ते निर्णय योग्य पद्धतीने घेतील, असा मला विश्वास आहे. असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू केलेले उपोषण सोमवारीही कायम आहे. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक आझाद मैदानावर आले.  या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच मनोज जरांगे यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAmit Thackerayअमित ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार