शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: 'चाकणमधील जाळपोळीच्या घटनेत परराज्यातील लोकांचा समावेश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 21:08 IST

Maratha Reservation: चाकण येथील हिंसाचारात बाहेरील लोकांचा सहभाग होता. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. मात्र, केवळ आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

पुणे - चाकण येथील हिंसाचारात बाहेरील लोकांचा सहभाग होता. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. मात्र, केवळ आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. तसे लेखी आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली. तसेच 2 तारखेपासून पुण्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 

पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, बाळासाहेब अमराळे आदी उपस्तिथ होते. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, तसेच आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करावे, कुठल्याही चुकीच्या प्रवृत्तींना आंदोलनात सहभागी होऊ देऊ नये, असे आवाहन यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले. राजेंद्र कोंढरे म्हणाले, चाकण येथील हिंसाचारात परराज्यातील लोक सामील होते. हिंसाचार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. पण, केवळ आंदोलनात सामील झालेल्या तरुणांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत. तसा आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात यावा. असा लेखी आदेश अद्याप पोलिसांकडे न आल्याने समाजात वेगळा संदेश जात आहे. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये. 1 ते 9 ऑगस्ट या काळात मराठा संघटनेचे कार्यकर्ते स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. पुण्यात 2 तारखेला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल. मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन हे लोकशाही मार्गानेच करावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

मराठा मोर्चावेळी जाळपोळ करणारे, बरेच तरुण बाहेरुन आले होते. आतापर्यंत आम्ही 22 आरोपींची ओळख पटवली असून त्यांना कुठल्याही क्षण अटक होऊ शकते. या 22 जणांना न्यायालयाकडून जामीन मिळू नये, तसेच त्यांना अधिकाधिक कडक शिक्षा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे तेथील पोलीस अधिकारी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाPuneपुणे