शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही समाजाला न दुखवता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; आमदार अमित गोरखे यांची भूमिका

By अजित घस्ते | Updated: July 15, 2024 18:17 IST

शिक्षणदृष्ट्या मातंग समाजाचीही प्रगती झालेली नाही, या समाजातील तरुण ‘आयएएस’ कसे होतील, याकडे मी विशेष लक्ष देणार

पुणे: घटनेत बदल करण्याचा अधिकार कोणालाच दिला नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी नॉरेटिव्ह सेट करण्यात येत आले. आरक्षण हा राजकीय विषय आहेत. कुणालाही न दुखवता सगळ्यांना आरक्षण कसे देता येईल, यासाठी महायुतीच्या वतीने प्रयत्न केला जाईल’’ मराठा समाजासह सर्व वंचित घटकातील बांधवाना आरक्षण मिळायला हवे असे नवनिर्वाचित विधानसभेचे आमदार अमित गोरखे यांचा पुणे नवी पेठ येथे वार्तालाप पुणे श्रमिक पत्रकार संघा तर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सांगितले. तसेच ‘‘ कोणत्याही समाजाला न दुखविता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,’’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

भाजपाने केले थेट आमदार 

‘‘मला विधान परिषदेवर संधी मिळण्यामागे सर्वात मोठा वाटा हा माझ्या समाजाचा आहे. त्यानंतर माझ्या आई-वडिलांचा आहे. गरीब कुटुंबातून मी पुढे आलो. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे काम मी करीत आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार मला २०१२ साली मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यावेळी भेट झाली हाेती. त्यानंतर मी राजकीय जीवनास सुुरुवात केली. आजपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने मातंग समाजाला विधान परिषदेवर थेट संधी दिली नाही. परंतु भाजपाने हे करून दाखविले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसांपर्यंत मला अशी संधी मिळेल, असे वाटले नव्हते. मात्र भाजपाने मला थेट आमदारपदीची संधी दिली हे भाजपाच करू शकते.

वंचित घटकासाठी प्रयत्न 

अनुसुचित जातीतील विधान परिषदेचा आमदार केवळ समाजामुळे झालाे आहे. त्यामुळे पुढील काळात मागासलेल्या ५९ जातींसाठीच काम करणार आहे. शिक्षणदृष्ट्या मातंग समाजाचीही प्रगती झालेली नाही. या समाजातील तरुण ‘आयएएस’ कसे होतील, याकडे मी विशेष लक्ष देणार आहे. आरटीईचे अनुदानास शासनाला विलंब होत आहे. गेले ८ ते १० वर्ष सरकारचे खाजगी संस्था अनुदान दिले नसल्याने शाळाचे नुकसान होते आहे.यामुळे शिक्षणसंस्थांची मोठी कुचंबणा होते. त्यादृष्टीने विशेष प्रयत्न करणार असल्याचे गोरखे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMLAआमदारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार