शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांच्या बेतले जिवावर

By admin | Updated: August 14, 2014 04:36 IST

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी मोटारीत भरणे, टप्पा वाहतुकीस परवानगी नसतानाही राजरोसपणे अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणे

मंगेश पांडे, पिंपरीक्षमतेपेक्षा अधिक प्रवासी मोटारीत भरणे, टप्पा वाहतुकीस परवानगी नसतानाही राजरोसपणे अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणे अशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय चिंचवड ते दादर दरम्यान, तसेच शहरातील इतरही ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे. हा प्रवास प्रवाशांच्याच जीवावर बेतत आहे. तीन दिवसांपूर्वीच लोणावळ्याजवळील बोरजजवळ अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीच्या अपघातात तीन जणांना जीव गमवावा लागला. राजरोसपणे अवैध वाहतूक सुरू असतानाही कारवाई होत नसल्याने या वाहतुकीला अभय कोणाचे असाच प्रश्न उपस्थित होतो. मुंबई अथवा दादरला जायचे असल्यास रेल्वे आणि एसटी बससेवा उपलब्ध आहेत. रेल्वेची वेळ जुळत नसल्याने आणि झटपट प्रवास व्हावा यासाठी अनेकजण खासगी प्रवासी गाडीने प्रवास करतात. चिंचवड स्टेशन येथे खासगी वाहनाने प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. चिंचवड स्टेशन येथे दादरला जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. काही पावलांवरच एसटीचा अधिकृत थांबा आहे. मात्र, तेथील वाहनचालक प्रवाशांना थांब्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. पोलिसांच्या डोळ्यादेखत अवैध वाहतूक सुरू असते. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. प्रवासी वाहने उभ्या राहत असलेल्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावरच पोलीस ठाणे आहे. असे असतानाही अवैध प्रवासी वाहतुकीचा हा प्रकार पोलिसांच्या डोळ्यांना दिसत नाही, हे आश्चर्य आहे.