शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

कित्येक सरकारं आली अन् गेली, आमदार, खासदारकीसह कुणी मंत्रीही झाले; पण इंदापूरचा पाणीप्रश्न ‘जैसे थे'च! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 19:01 IST

२२ गावांना दोन पिढ्यांच्या संघर्षानंतर पदरी पाणीप्रश्नी प्रतीक्षाच... 

सतिश सांगळे - 

कळस:  राज्यात तीस वर्षात अनेक सरकारं आली अन् गेली, बरेच जण खासदार, आमदार आणि मंत्री म्हणून मिरवून गेले. पण इंदापूर तालुक्यातील निरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांच्या पदरी संघर्षानंतरही बारमाही पाणी प्रश्नांबाबत लढा देवूनही प्रतीक्षाच आली आहे. गेल्या ३० वर्षांपासून धगधगत असलेल्या या पाणीप्रश्नाला राजकीय पक्षांनी वेगळा रंग दिल्याने या पाणीप्रश्नाचे भिजत घोंगडे कायम राहिले आहे.

निरा डावा कालव्यावरील अंथुर्णे पासुन शेटफळहवेली पर्यंत बावीस गावांच्या शेतीसिंचनाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी खडकवासला कालव्यावर सणसर जोड बोगदा तयार करण्यात आला .यामधुन निरा डावा कालव्यामध्ये पाणी आणून चारी क्रमांक ४६ ते ५९ मध्ये पाणी आवर्तन देऊन हा बारमाही भाग बागायती करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार निमगाव-केतकी येथे येवून शेतकरी मेळाव्यात प्रचंड जनसमुदाया समोर जाहीर सभेत केली. शेतकऱ्यांना ऊसाची लागण करावी १२ महिन्याला १२ पाळ्या मिळतील, असे आश्वासन दिले गेले.

परंतु, आज तब्बल ३० वर्ष पुर्ण झाली .तरी २२ गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही.१९९५ मध्ये युतीचे शासन सरकार आले .त्यावेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १९९७ मध्ये धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास २२ गावांतील खातेदारांना एकरी १५ गुंठे असे सुमारे १२५० एकर क्षेत्रास ७ नंबर अर्जावर  पाणी परवानगी बारमाही देण्यास मंजुरी दिली .विधान परिषद समिती सदस्यांच्या पाहणी नंतर कायम स्वरूपी योजना मंजुर करावी,अशी शिफारस झाली.त्यामुळे एकरी १५ गुंठ्याएवजी २० गुंठ्याला ७ नंबर फॉर्मवर पाणी देण्यास मंजुरी आली.

आता राज्याचे विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या प्रश्नासाठी मोठी ताकद लावुन उजनी धरणावरुन ५ टीएमसी पाणी मंजुर केले. मात्र सोलापुर मधील स्वपक्षीय आमदारांच्या दबावामुळे एक महिना होण्याच्या अगोदरच आदेश रद्ध करण्यात आला .त्यामुळे हा प्रश्न भिजत राहणार आहे. या गावातील शेतकऱ्यांना  कायम स्वरूपी बारमाही पाण्याबाबत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

तालुक्यातील अंथुर्णे भरणेवाडी शेळगाव निमसाखर, रेडणी, निमगांव-केतकी, गोतंडी दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, निरवांगी, रेडा,रेडणी, काटी, लाखेवाडी, खोरोची, भोडणी  या  गावांतील शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांनी यासाठी संघर्ष केला आहे .मुळच्या अध्यादेशाप्रमाणे ३.९ टीएमसी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.——————————————खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेला प्रथमच उभ्या राहिल्यानंतर २२ गावांतील शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेऊन निमगांव-केतकी येथे हक्काच्या बारमाही पाण्यासाठी काही दिवस उपोषण देखील केले होते .मात्र ,आश्वासित केल्याने विरोध मावळला. परंतू, अद्यापही हा प्रश्न सोडवण्यात खासदारांनी ताकद दिली नाही .तसेच सध्या ५ टीएमसी पाणी वादात  पक्षासाठी सोयीची भुमिका घेतली असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.———खडकवासला कालव्यावरुन निरा डावा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सुरवातीला कडबनवाडी येथे सर्वेक्षण करण्यात आले होते .मात्र, काही राजकारण्यांच्या दबावामुळे सणसरला जोड बोगदा जोडण्यात आला .त्यावेळेपासुन राजकारणाच्या कात्रीत सापडलेला हा बोगदा या भागाला वरदान ठरण्याऐवजी शापित ठरला आहे.——

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीState Governmentराज्य सरकारUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी