शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अनेक प्रकरणे समोर येतायेत; शिंदे-पवार गट गोत्यात, भाजपही ४ हात लांब - सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 11:34 IST

भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापासून ४ हात लांब राहात असून कदाचित त्यांना झटकून टाकण्याचाही प्रकार असू शकेल

पुणे : वेगवेगळ्या कारणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट गोत्यात येत आहे. भारतीय जनता पक्ष त्यामुळेच त्यांच्यापासून चार हात लांब राहात आहे. हा कदाचित त्यांना झटकून टाकण्याचाही प्रकार असू शकेल, असा अंदाज शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. पोर्शे कार अपघात प्रकरणात पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

अंधारे बुधवारी दुपारी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, भाजपला आता एकनाथ शिंदेअजित पवार यांच्यापासून फारकत घ्यायची असेल. त्यामुळे या दोन्ही गटाची अनेक प्रकरणे निघत आहेत. ती निघत आहेत की काढली जात आहेत?, असा प्रश्न त्यांनी केला. शिंदे व ठाकरे एकत्र येतील, असे भरत गोगावले म्हणत असतील तर तो त्यांचा आशावाद आहे, मला तरी तशी सुतराम शक्यता वाटत नाही, असेही अंधारे म्हणाल्या. पोर्शे कार अपघात प्रकरणाचे सगळे पुरावे मिटवले जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. यापूर्वी ललित पाटील यानेही मी सर्वांची नावे घेईल असे सांगितले होते. आता अजय तावरे हाही मी सर्वांची नावे घेईल, असे सांगत आहे. ललित पाटील प्रकरणाचे पुढे काय झाले? तसेच अजय तावरे याचेही होण्याची शक्यता आहे. त्याच्या जिवाला धोका आहे असे मला वाटते, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे.

ससूनमधील रक्त चाचणी अहवाल बदलण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अध्यक्ष डॉ. पल्लवी सापळे यांच्याबद्दल आक्षेप आहेतच. त्यांच्यावरच आरोप आहे, मग त्यांनी केलेली चौकशी मान्य कशी करायची? असा प्रश्न अंधारे यांनी केला.

...तर राजीनामा द्या 

डाॅ. अजय तावरे व मंत्रालयाचा ६ वा मजला याचा काय संबंध आहे ते सरकारनेच पाहावे. सहाव्या मजल्यावर मंत्र्यांची दालने असतात. आमदार सुनील टिंगरे यांनी तावरे याला अधीक्षक नेमण्याची शिफारस केली असेल तर तो आधी खोटे का बोलला? हा सगळा गुन्ह्याच्या तपासाचा भाग आहे आणि तो गृहखात्याने करायचा आहे. ते खाते सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या, असेही अंधारे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेSushma Andhareसुषमा अंधारेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण