मंगलमूर्ती मोरया! संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगावच्या महागणपतीला '५१०' लाडूंचा महानैवेद्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 04:36 PM2021-08-25T16:36:16+5:302021-08-25T16:36:26+5:30

देवस्थानच्या वतीने श्रींच्या समोर दु. १२ वाजता महापुजा व महानैवेद्य करण्यात आला

Mangalmurti Moraya! On the occasion of Sankashti Chaturthi, '510' laddu was offered to Mahaganapati of Ranjangaon | मंगलमूर्ती मोरया! संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगावच्या महागणपतीला '५१०' लाडूंचा महानैवेद्य

मंगलमूर्ती मोरया! संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगावच्या महागणपतीला '५१०' लाडूंचा महानैवेद्य

googlenewsNext
ठळक मुद्देशासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद

रांजणगाव गणपती : संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून ५०१ मोतीचुर लाडूंचा महानैवेद्य दाखविण्यात आला. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वाजता अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली.

देवस्थानच्या वतीने श्रींच्या समोर दु. १२ वाजता महापुजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच उद्योजक व गणेश भक्त संतोष गवारे व महागणपती सेवा मंडळ यांच्याकडून ५०१ मोतीचुर लाडूंचा महानैवेद्य श्री महागणपतीला दाखविण्यात आला. शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून "श्रीं" ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू आहेत. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Web Title: Mangalmurti Moraya! On the occasion of Sankashti Chaturthi, '510' laddu was offered to Mahaganapati of Ranjangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.