अटकेत असलेले राष्ट्रवादीचे निलंबित उपाध्यक्ष मंगलदास बांदल ससूनमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 21:34 IST2020-04-01T21:30:45+5:302020-04-01T21:34:21+5:30
नामवंत सराफाला ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी २१ मार्च रोजी खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते.

अटकेत असलेले राष्ट्रवादीचे निलंबित उपाध्यक्ष मंगलदास बांदल ससूनमध्ये दाखल
पुणे : नामवंत सराफाला खंडणी प्रकरणी अटक केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी दाखल करुन घेतले आहे.
नामवंत सराफाला ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी २१ मार्च रोजी खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते.
बांदल यांनी काल रात्री आपला घसा दुखत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी दाखल करुन घेतले आहे, अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली.सराफाला खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी या अगोदर चौघांना अटक केली आहे. व्हिडिओ क्लिप दाखवून ती व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. बांदल यांच्या सांगण्यावरुन रुपेश चौधरी याने ही खंडणी मागितली होती.