पळसदेव येथील शेततळ्यास माने यांची भेट -दहा हजार मत्स्यबीजांची केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:14 IST2021-08-14T04:14:33+5:302021-08-14T04:14:33+5:30
शेलार यांनी रूपचंद जातीचे ३० हजार मत्स्यबीज आपल्या तळ्यात सोडले होते. मोठ्या कष्टाने, नियमित खाद्य व औषधांची पूर्तता ...

पळसदेव येथील शेततळ्यास माने यांची भेट -दहा हजार मत्स्यबीजांची केली मदत
शेलार यांनी रूपचंद जातीचे ३० हजार मत्स्यबीज आपल्या तळ्यात सोडले होते. मोठ्या कष्टाने, नियमित खाद्य व औषधांची पूर्तता करत या तळ्यात मासे वाढवले होते. परंतु काही समाजकंटकांच्या कारस्थानाने ही घटना घडली. आधुनिकतेची कास धरत, शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणून शेतकरी बांधव पशुपालनासह मत्स्यशेतीकडे वळाला असताना असा प्रकार घडला समाजाने आपली मानसिकता बदलायला हवी, असे प्रतिपादन या वेळी माने यांनी केले.
या वेळी संजय शेलार, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य मेघराज कुचेकर, नीलेश रंधवे, नंदकुमार शेलार, विनोद नगरे, संतोष नगरे, पिंटू पतुले, शिवाजी भोई, विशाल भोई, अविनाश घाडगे, सागर नगरे उपस्थित होते.
ओढवलेल्या परिस्थितीने खचून न जाता पुन्हा जोमाने सुरवात करावी आम्ही आपल्या सोबत आहोत, असा धीर देत भविष्यातही काही मदत लागल्यास आपण तत्पर असल्याचे आश्वासन या वेळी शेलार यांना देण्यात आले.
प्रविण माने, सदस्य जिल्हा परिषद
पळसदेव येथील शेतकरी संजय शेलार यांच्या मत्स्य शेतीतळ्यात जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी भेट देऊन पाहणी केली.