गरबा खेळताना घटस्फोटीत पत्नीकडे पाहणाऱ्या पतीला मारहाण, पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 16:22 IST2018-10-15T16:04:57+5:302018-10-15T16:22:10+5:30
हरेश यांचे 4 वर्षापूर्वी मनिषा हिच्याशी लग्न झाले होते. मात्र, गतवर्षी या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर, मनिषाने दुसरे लग्न केलं. मात्र, शनिवारी गरबा खेळताना मनिषा आणि हरेश एकाच ठिकाणी आले.

गरबा खेळताना घटस्फोटीत पत्नीकडे पाहणाऱ्या पतीला मारहाण, पोलिसात तक्रार
पुणे - आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीकडे एकटक पाहणे, एका व्यक्तीला चांगलच महागात पडलं आहे. गरबा खेळताना हरेश ललवानी हे आपल्या पूर्वपत्नीकडे एकटक पाहत होते. त्यामुळे, सध्या त्या महिलेचा पती असलेल्या व्यक्तीने हरेश यांना बेदम मारहाण केली. शनिवारी रात्री ही घटना घडली असून याबाबत हरेश यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हरेश हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत.
हरेश यांचे 4 वर्षापूर्वी मनिषा हिच्याशी लग्न झाले होते. मात्र, गतवर्षी या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर, मनिषाने दुसरे लग्न केलं. मात्र, शनिवारी गरबा खेळताना मनिषा आणि हरेश एकाच ठिकाणी आले. मी माझ्या घरासमोर गरबा खेळत होतो. मनिषाही तेथे होती, त्यावेळी तिने माझ्याकडे पाहिले असता, मला तिच्या सध्याच्या पतीने मारहाण केल्याचं हरेशन तक्रारीत म्हटले आहे. अशोक दुर्गेश तेजवानी असं मनिषाच्या पत्नीचं नाव आहे.
अशोकने हरेशच्या डोक्यात काठी मारली, त्यामुळे हरेश रक्तबंबाळ झाला होता. तसेच हरेशच्या कुटुंबीयातील तिघे जखमी झाले आहेत. तर अशोकने हरेशच्या कुटुबीयांना गल्लीतून निघून जाण्याची धमकी दिली आहे. येथील घर सोडून जा, अन्यथा वाईट परिणाम होतील, असे अशोकने म्हटल्याचे हरेशने पोलीस तक्रारीत म्हटले आहे.