शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 20:10 IST

विरोधकांचा अवघ्या एका जागेवर विजय;शरद पवार गटाला सभासदांनी नाकारले

माळेगाव -  माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने २० जागा जिंकत नेतृत्वाचा करीश्मा सिध्द केला.तर गुरुशिष्यांचा सहकार बचाव पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानाने लागले.यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडुन आले,तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.तसेच शरद पवार गटाला सभासदांना सपशेल नाकारले.या गटाला एकही जागा मिळालेली नाही.उपमुख्यमंत्री पवार यांनी ब वर्गातून स्वत:ची उमेदवारी जाहिर करुन  स्वतःचेच नाव  चेअरमन पदासाठी घोषित केले.त्यामुळे या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले.अजित पवार यांनी हि निवडणुक गांभीर्याने घेत स्वत:ची रणनिती आखली. सलग आठ ते दहा दिवस कारखाना कार्यक्षेत्रात तळ ठोकत सभासदांच्या गाठीभेटी घेत नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला. तसेच दहा ते बारा सभा घेऊन विरोधकांच्या आरोपांना तितक्याच तत्परतेने उत्तर देत निवडणुकीची हवा व निकाल आपल्या बाजूने वळवण्यात पवार यांनी यश मिळविले.

या निवडणुकीत अजित पवार यांनी अत्यंत प्रभावी आणि आक्रमक प्रचार केला.आपल्या भाषणात त्यांनी सलग पाच वर्ष राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा ऊसाला दर देणार,निवडून येणाऱ्या संचालकांना कोणतेही वाहन अथवा ड्रायव्हर मिळणार नाही, संचालकांना भत्ता मिळणार नाही,त्यांना फक्त चहा मिळणार,कारखान्याला राज्याचा व केंद्राचा निधी मिळवून देणार,कारखाना कार्यक्षेत्रातील रस्ते एस.आर.एस फंडातून करणार.रस्ते करण्यासाठी सभासदांचा एकही रुपया घेतला जाणार नाही,केंद्राचे व राज्याचे अनेक कारखान्याला आणण्यासाठी मदत करणार,संचालकाला कारखान्यातून एकही रुपयाचा उचल मिळणार नसल्याची भर सभेत घोषणा केली. अजित पवार यांच्या या घोषणांनी सभासदांमध्ये एक वादळ निर्माण झाले. सभासदांनी देखील  अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने पॅनल विजयी केले.मागील निवडणुकीत विरोधकांचे चार संचालक निवडून आलेले होते .त्यामध्ये स्वतः सहकारमहर्षी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्यासह ॲड.जि.बी.गावडे व प्रताप आटोळे यांचा समावेश होता. त्यानंतर प्रताप आटोळे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला.उर्वरीत तीन संचालक कारखान्याच्या अनेक बोर्ड मीटिंगला हजर राहिले नाहीत,सभासदांची बाजू उचलून धरली नाही, कामगारांची प्रश्न हाताळण्यासाठी तसेच मिटवण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे मुद्दे उपमुख्यमंत्री पवार यांनी सभेत उचलुन धरले. त्यातूनच  विरोधी वातारवण निर्माण करण्यात पवार यांना यश आले.परीणामी विरोधकांना  मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याचे मानले जाते.शरद पवार गटाने सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनलचे २० उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केले होते. त्यांच्या उमेदवारांनी साधारणपणे ५०० ते १००० मते घेतली. त्यांच्या उमेदवारांचा आणि मतांचा कुठलाही परिणाम अजित पवार यांच्या पॅनलवर झालेला नसल्याचे आजच्या निकालाने  अधोरेखित झाले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीResult Dayपरिणाम दिवस