शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Malegaon Factory Election Result: माळेगावच्या बिनविरोध निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी केला होता,मध्यस्थीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 21:22 IST

Malegaon Karkhana Election Result- आपण महायुतीमध्ये एकत्र आहोत, इथही मार्ग काढा, तुम्ही माझ एका,तर तुम्हाला थोडे समजून घ्यावे लागेल.तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात,काहीतरी मार्ग काढा,असे सांगितले.त्यानंतर चर्चा सुरु झाली,मात्र ती निष्फळ ठरली,असा गाैप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

Malegaon Karkhana Election Result- माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीबाबत काहीजण मार्ग निघावा या मताचे होते.माझ कोणी कायमचं दुश्मन नाही.कोणी प्रयत्न करतंय का,हे मी पाहत होतो. प्रयत्न होत असल्यास दुधात साखरंच यामध्ये मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, पृथवीराज जाचक यांना चेअरमन करुन तुम्ही ‘छत्रपती’ चा विषय मार्गी लागला,मग माळेगावचा का नाही लावत, आपण महायुतीमध्ये एकत्र आहोत, इथही मार्ग काढा, तुम्ही माझ एका,तर तुम्हाला थोडे समजून घ्यावे लागेल.तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात,काहीतरी मार्ग काढा,असे सांगितले.त्यानंतर चर्चा सुरु झाली,मात्र ती निष्फळ ठरली,असा गाैप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.शिवनगर येथे निळकंठेश्वर पॅनलच्या विजयाबद्दल आयोजित आभार मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.यावेळी पवार म्हणाले,मुख्यमंत्री फडवणीस संबंधितांशी बोलले,त्यावेळी समोरच्यांनी मुख्यमंत्र्यांना, यावेळी हवा आपली आहे,समोरील सगळे पडणार असल्याचे सांगितले.तसेच जाचक यांनी देखील समान जागावाटपाचा माझ्या परस्पर प्रस्ताव दिला. त्यासाठी जाचक यांनी हा प्रस्ताव मान्य न झाल्यास ‘छत्रपती’चे चेअरमन पदाचा राजीनामा देवू असे सांगत ‘चेअरमन’ पद पणाला लावले.पण जाचक यांना देखील हात टेकले. तसेच शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष एस. एन जगताप माझ्याकडे आले होते. त्यांनी सहा जागा द्या असे म्हणाले.

मी त्यांना दोन जागा देतो,असे सांगितल्यावर त्यांनी संमती दर्शवली होती, मात्र त्यांनी पुन्हा काही नावांचा आग्रह धरला.ते नवीन नवीन मुद्दे ते काढू लागले, त्यामुळे मला नाईलाजाने पॅनल घोषित करावा लागला.ज्यावेळी माझ्या लक्षात आले की मला पॅनलच करावा लागेल, त्यावेळीही माझ्या मनात कुठेही मला संचालक किंवा अध्यक्ष व्हायचे नव्हते. सहा ते सात लोक चेअरमन पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार होते. त्यामुळे मला माझेच नाव पुढे करावे लागले.माझ्या लक्षात आले,मी कितीही त्यांना पदे दिली की तेवढ्यापुरते दादा दादा करतात,मात्र, पुढार्यांनी काही केले तरी सर्वसामान्य माणुस माझ्या पाठीशी आहे.माळेगांव कारखाना देशातील सर्वेात्कृष्ठ कारखाना म्हणुन नावारुपाला आणु,असा शब्द देतो,असे पवार म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजवर्धन शिंदे यांनी केले .यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष केशवराव जगताप,‘छत्रपती’चे अध्यक्ष पृथवीराज जाचक,बाळासाहेब तावरे,विश्वास देवकाते,तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, सुनील पवार, पृथ्वीराज जाचक,योगेश जगताप,रामदास आटोळे आदी उपस्थित होते.आभार यांनी अविनाश देवकाते मानले अजित पवार यांनी खांडज-शिरवली गटाचे कौतुक केले तसेच माळेगाव गटातील शिवराज राजे जाधव यांचे खास कौतुक केले.अजित पवार म्हणाले मला माळेगाव मधून अनेक स्थानिक नेत्यांनी सांगितले की जाधवराव यांना उमेदवारी देऊ नका परंतु मला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत होती त्यामुळेच मी शिवराज राजे जाधवराव यांचे नाव उमेदवारीसाठी जाहीर केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसResult Dayपरिणाम दिवसElectionनिवडणूक 2024Malegaonमालेगांव