शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पावसापासून संरक्षणासाठी न्यायालयाच्या आवारातच वकिलांची व्यवस्था करा: उच्च न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 11:43 IST

राज्यातील न्यायालयांचे कामकाज गेल्या काही दिवसांपासून 2 शिफ्टमध्ये सुरू झाले आहे..

ठळक मुद्देवकिलांना पावसाळ्यात मिळाला दिलासा

पुणे : राज्यातील न्यायालयातील कामकाज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असताना न्यायालयातील बार रूम, कॅन्टीन आणि वकिलांचे चेंबर बंद ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. एकीकडे हे सगळे बंद असताना गर्दी होऊ नये यासाठी वकिलांना न्यायालयाच्या पॅसेजमध्ये थांबण्यास देखील मनाई करण्यात आली होती. त्यामुळे पाउस सुरू झाल्यावर आम्ही थांबायचे कुठे? असा प्रश्न वकिलांना पडला होता. मात्र यावर उपाय म्हणून उच्च न्यायालयाने वकिलांना थांबण्यासाठी न्यायालयाच्या पॅसेजमध्ये व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाला दिला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात वकिलांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज २३ मार्च पासून बंद होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील न्यायालय दोन शिफ्ट मध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र न्यायालयाचे कामकाज सुरू करत असताना कोरोनाचा सवंसर्ग रोखण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी उच्च न्यायालयाने काही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ८ जुनपासून राज्यातील सर्व न्यायालयातील कामकाज सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अशा दोन शिफ्ट मध्ये कामकाज सुरू झाले होते. राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये सुरू करण्या बाबत आदेश दिले आहेत. 

 

...................न्यायालयाचे कामकाज पुन्हा एकदा एकाच शिफ्टमध्ये सुरू करण्यात आल्यामुळे न्यायालयात होणारी वकिलांची गर्दी कमी होणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात या वकिलांच्या थाबण्याची, बसण्याची सोया न्यायालयाच्या पॅसेजमध्ये करण्याचा आदेश दिला आहे. आवारात मोठे पॅसेज, बाकडी उपलब्ध असल्याने वकिलांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था करता येऊ शकते. त्यामुळे फिजिकल डिस्टनसिंग ठेवता येईल. ऍड . सतीश मुळीक (अध्यक्ष, बार असोसिएशन)

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयRainपाऊसMumbai High Courtमुंबई हायकोर्टadvocateवकिल