शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद मोहोळ हत्याप्रकरणात मोठी कारवाई; ८ जण पुणे पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 22:56 IST

शुक्रवारी आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. शरद मोहोळच्या लग्नाचा आज वाढदिवस होता

पुणे - कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला होता. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. त्यामध्ये शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला होता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली असून ८ जणांना ताब्यात घेतलं आहे.  

शुक्रवारी आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. शरद मोहोळच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. तो मंदिरात चालला होता. त्यावेळी अज्ञातानी मोहोळवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे ८ जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून तीन पिस्टल हस्तगत केले आहेत. ज्या पिस्टलमधून शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला होता, ती पिस्टल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या आरोपींकडून हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या २ दुचाकी सुद्धा ताब्यात घेतल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनी ही कारवाई केली असून आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. नेमकी ही हत्या कशामुळे करण्यात आली, याचा तपास होत आहे. 

दरम्यान, खेड शिवापूर जवळील भागात हे सर्वजण लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे 

शरद मोहोळ कोण?

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली. येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस