Mahavitaran : शिरूरमध्ये वीज चोरणाऱ्यांना महावितरणचा शॉक; 'या' गावातील ४० जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:02 IST2022-02-23T14:01:21+5:302022-02-23T14:02:06+5:30
महावितरणच्या वीज मीटर मध्ये फेरफार करून चोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणच्या पथकाने कारवाई करत वीज चोरांना शॉक दिला

Mahavitaran : शिरूरमध्ये वीज चोरणाऱ्यांना महावितरणचा शॉक; 'या' गावातील ४० जणांवर कारवाई
रांजणगाव सांडस : सादलगाव ता शिरूर येथील महावितरणच्यावीज मीटर मध्ये फेरफार करून चोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणच्या पथकाने कारवाई करत वीज चोरांना शॉक दिला. ही कारवाई महावितरणचे केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके व उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने यांच्या नेतृत्वाखाली वडगाव रासाई शाखा अभियंता मुंगशे व न्हावरे शाखा अभियंता बाळासाहेब टेंगले व मतीन मुलानी यांसह ४० जनमित्रांच्या पथकाने वीजचोरी पकडली आहे. सादलगावतील 170 वीज मीटर व आकडे चेक करून चाळीस जणांवर वीज चोरीची कारवाई करून दंड केला.
यावेळी राजेंद्र येडके यांनी सांगितले की, यापुढे वीजचोरी वरती कठोर कारवाई करण्यात येईल व दंड न भरल्यास फौजदारी गुन्हे वीजचोरी केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५, व १३८ प्रमाणे अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्व ग्राहकांनी मीटर वीज मीटर सुस्थितीत ठेवावा व नियमाप्रमाणे वीज वापर करावा, अशीच कारवाई शिरूर व दौंड तालुक्यात प्रत्येक आठवड्यात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी राजेंद्र येडके कार्यकारी अभियंता सोमनाथ माने उपकार्यकरी अभियंता, सुयश मुंगशे शाखा अभियंता, बाळासाहेब टेंगले, सहाय्यक अभियंता मतीन मुलानी शाखा अभियंता, ४० जनमित्रांच्या सहकार्याने कारवाई केली.