शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मविआने ४८ जागा आपापसांत घ्याव्यात, आम्हाला ज्या जागा हव्या त्या आम्ही घेऊ : वंचित बहुजन आघाडी

By भाग्यश्री गिलडा | Updated: January 25, 2024 15:28 IST

आम्हाला महाविकास आघाडीसोबत जायचे आहे. परंतु महाविकास आघाडी कोणत्याच चर्चेला किंवा बैठकांना आम्हाला बोलावत नाही....

पुणे : लोकसभा निवडणुकीची तयारी आम्ही करत आहोत. आम्हाला महाविकास आघाडीसोबतच जायचे आहे मात्र महाविकास आघाडीने ४८ जागांचे आपापसांत करून घ्यावे, त्यानुसार आम्हाला पुढील दिशा ठरवता येईल असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला केंद्रात आणि राज्यात आरएसएस, बीजेपीचे सरकार येऊ द्यायचे नाही हे आमचे धोरण आहे. त्यामुळे गठबंधनातून बाहेर पडण्याचा आमचा काही विचार नाही. आम्हाला महाविकास आघाडीसोबत जायचे आहे. परंतु महाविकास आघाडी कोणत्याच चर्चेला किंवा बैठकांना आम्हाला बोलावत नाही. त्यामुळे त्यांनी ४८ जागा आपसांत वाटून घ्याव्यात त्यानंतर आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत त्या आम्ही घेऊ."

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही वंचित बहुजन आघाडी यांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करू असे सांगितले पण दुसऱ्या बाजूला निवडणूक नंतर आम्ही निर्णय घेऊ असे ते सांगत असतात. आम्ही इंडिया आघाडी मध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आघाडी मध्ये समसमान जागा वाटप करून आम्हला १२ जागा निवडणूक लढण्यास देण्यात यावा असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते एडवोकेट प्रियदर्शी तेलंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले.

पुढे बोलताना तेलंग म्हणाले, नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अनेक पक्ष त्यात सहभागी झाले असून आम्ही महाविकास आघाडीला सोबत जाण्यास तयार आहे. भाजप आणि संघ प्रणित सरकार केंद्र आणि राज्यातून हद्दपार करण्यासाठी आम्ही आघाडीत जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही किती जागा लढवण्याची आहे हे वाटाघटीचा भाग आहे. महाविकास आघाडी मध्ये आम्हाला घेतले गेले नाही तर आम्ही आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी करू. आमचे धोरण महाविकास आघाडी सोबत जाण्याचे आहे मात्र, त्यांनी आम्हाला खेळवत ठेवले तर आम्ही पुढची तयारी करु. तीन पक्ष आम्हला सोबत घेण्याचे सांगत आहे पण प्रत्यक्ष अंमलबजावणी करत नाही. काँग्रेस पक्षाला आमच्याबद्दल काही अडचण असेल तर त्यांनी त्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. यावेळी  फारुख अहमद, प्रा. सोमनाथ साळुंके, प्रफुल्ल गुजर, गौरव जाधव, सुनील धेंडे उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी