महात्मा फुले यांच्यामुळेच महिलांना प्रतिष्ठा : गौरी कुंजीर
By Admin | Updated: November 28, 2014 23:13 IST2014-11-28T23:13:30+5:302014-11-28T23:13:30+5:30
‘‘महात्मा जोतिबा फुलेंनी राबविलेल्या महिला शिक्षण धेरणामुळेच महिलांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळेच आम्ही महिला व्यासपीठावर दिसत आहे.

महात्मा फुले यांच्यामुळेच महिलांना प्रतिष्ठा : गौरी कुंजीर
खळद : ‘‘महात्मा जोतिबा फुलेंनी राबविलेल्या महिला शिक्षण धेरणामुळेच महिलांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळेच आम्ही महिला व्यासपीठावर दिसत आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण समाजाचे काही तरी देणं लागतो, या भावनेतून त्यांचे विचार समाजात रुजविण्याची, प्रत्येक घराघरात पोहोचविण्याची गरज आहे,’’ असे मत पुरंदर पंचायत समितीच्या सभापती गौरी कुंजीर यांनी व्यक्त केले.
खानवडी (ता. पुरंदर) येथे पंचायत समिती पुरंदर व ग्रामपंचायतीतर्फे महात्मा जोतिराव फुले यांच्या 124व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गौरी कुंजीर बोलत होत्या.
या वेळी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सारिका इंगळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, माजी उपसभापती माणिकराव झेंडे, उपसभापती अनिता कुदळे, पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, अंजना भोर, सरपंच चंद्रकांत फुले, सुनील धिवार, रवींद्र फुले, सीमा होले, नीलिमा बधे, बापू भोर, नीलेश जगताप, सुरेश मोरे, स्वाती दुर्गाडे, तानाजी झगडे, रोहिदास मेमाणो, गोरख मेमाणो, तानाजी फडतरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सारिका इंगळे म्हणाल्या,‘‘महात्मा फुलेंनी त्या काळी दिलेले विचार हे समाजाचा उद्धार करणारे, तारणारे होते. त्यांनी त्या काळी आधुनिक शेतीचा मंत्र देत पाणी अडवा, पाणी जिरवा हा दिलेला विचार प्रभावीपणो अवलंबला असता, तर आज दुष्काळ दिसला नसता. महात्मा फुलेंचा वारसा टिकविताना त्यांच्या कार्याचा वटवृक्ष झाला आहे. याचे जतन करायचे, त्यांची विचारधारा अखंडपणो तेवत ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.’’
या वेळी दत्ता झुरंगे यांनीही विचार व्यक्त केले. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पध्रेतील प्रथम विजेत्या शिक्षिका स्वाती दुर्गाडे यांचे व्याख्यान झाले.
प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत फुले यांनी, तर सूत्रसंचालन रवींद्र फुले यांनी केले. आभार चंद्रकांत टिळेकर यांनी मानले.