शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
3
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
4
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
5
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
6
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
7
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
8
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
9
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
10
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
11
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
12
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
13
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
14
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
15
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
16
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
17
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
18
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
19
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
20
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

महात्मा गांधी विद्यालयावर शिक्षण विभाग मेहेरबान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 22:30 IST

बेकायदा शुल्क वसूली प्रकरण

ठळक मुद्देप्रशासक नियुक्ती आदेशास दिरंगाई अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून ८ हजार ते १३ हजार रुपये बेकायदा शुल्क

पुणे : उरळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाने अनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्क वसूल केल्याप्रकरणी या विद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती करावी,असा शिक्षणाधिका-यांचा प्रस्ताव गेल्या चार ते पाच महिन्यापासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पडून आहे.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने सुद्धा या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले असताना शिक्षण विभाग कारवाई करण्यास चालढकल करत आहे.त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी या विद्यालयावर एवढी मेहरबानी का दाखवत आहेत,असा सवाल उपस्थित केला जात आहे .     महात्मा गांधी विद्यालयाने अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून ८ हजार ते १३ हजार रुपये बेकायदा शुल्क आकारल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीतून समोर आले होते. मात्र,तरीही विद्यालयावर कारवाई केली जात नसल्याने या प्रकरणी बबन कोतवाल यांनी शिक्षण आयुक्त , पुणे विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.तसेच विद्यालयाने विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे घेतलेले शुल्क सर्व विद्यार्थ्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, शाळेने सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले नाही. परिणामी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी महात्मा गांधी विद्यालयावर प्रशासक नियुक्तीची कारवाई करावी,असा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर केला.परंतु,चार ते पाच महिन्यानंतरही प्रशासक नियुक्तिचा प्रस्ताव धुळखात पडून आहे.    दरम्यान, शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देवूनही सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले नाही. त्यामुळे शिक्षण विभागातर्फे विद्यालयावर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करावी,असे आदेश शिक्षण अधिका-यांना देण्यात आले आहेत,असे तत्कालीन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत यांनी सांगितले होते.परंतु,त्यांची या पदावरून बदली झाल्यामुळे पुढील कारवाई थांबली.----------------    शिक्षण अधिका-यांनी महात्मा गांधी विद्यालयावर प्रशासक नियुक्तीचा प्रस्ताव दिलेला असेल तर त्वरीत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शाळेवर प्रशासक नियुक्तीची शिफारस केली जाईल,असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक प्रवीण आहिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.--------------जिल्हाधिका-यांचे आदेश धुडकावलेमहात्मा गांधी विद्यालयावर नियमानुसार कारवाई करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा,असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिले होते. परंतु, कारवाई करण्याबाबत चालढकल करून शिक्षण विभागाने जिल्हाधिका-यांचे आदेशही धुडकवले आहेत,असे प्राप्त कागदपत्रांवरून दिसून येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयfraudधोकेबाजी