शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र तहात हरणार नाही; लोकसभेला पुण्यासह महाराष्ट्र जिंकू- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 08:43 IST

लोकसभेला पुणे जिल्ह्यातील चारही जागांसह महाराष्ट्र जिंकू, असा निर्धार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला....

पिंपरी : महाराष्ट्र लढाईत जिंकतो; मात्र तहात हरतो, असा इतिहास सांगितला जातो; मात्र जो तहात जिंकला, तो दिल्लीश्वर औरंगजेबही महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला, हाही इतिहास आहे. आता महाराष्ट्र तहात हरणार नाही, तर जिंकायचा इतिहास परत घडवणार आहे. लोकसभेला पुणे जिल्ह्यातील चारही जागांसह महाराष्ट्र जिंकू, असा निर्धार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला.

चिंचवड येथे सोमवारी दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘संघर्षयात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील व अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे व गौतम चाबुकस्वार, महादेव बाबर, अनिल बाबर, शिवसेना संघटक संजोग वाघेरे, प्रकाश बाबर, योगेश बाबर, भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते.

खा. राऊत म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी चाळीस आणि काँग्रेसचा एक असे ८१ आमदार त्यांनी फोडले असले, तरी आम्ही १८१ निवडून आणून इतिहास घडवू. जमलेले कार्यकर्ते म्हणजे विजयाची तुतारी आहे. गजानन बाबर यांनी संघर्षयात्रा सुरू केली, त्या यात्रेचे आपण सगळे पाईक आहोत. काल साताऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला तुतारी वाजवण्यात आल्या. आपला प्रचार विरोधकच करीत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत तुतारी आणि मशाल इतिहास घडवणार आहे.

खासदार कोल्हे म्हणाले की, विकास म्हणजे मिळणारा निधी, अथवा मोठमोठ्या इमारती उभ्या करणे नसते, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान झुकू न देणे हेही महत्वाचे असते. माजी आमदार लांडे म्हणाले की, काहीजण तुरूंगात जाण्यासाठी भितात, पण खासदार संजय राऊत तुरूंगात जाऊन आले तरीही ‘फुल नडतात’. छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहात २३ किल्ले हरले होेते. रयतेने विचार केला की, आता स्वराज्य गेले. मात्र, शिवाजी महाराज लढले आणि तहात हरलेले किल्ले परत जिंकले. आता तशीच वेळ आहे.

फटे लेकीन हटे नहीं : राऊत‘फटे लेकीन हटे नहीं’ ही आम्हा शिवसैनिकांची ओळख आहे. संजय राऊत तुरुंगात गेले; पण हटले नाहीत, ही बाळासाहेबांची प्रेरणा आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रापुढे राजकीय-सामाजिक संघर्ष वाढवून ठेवला आहे. आपल्या हक्काचे दुसरीकडे ओढून नेले जात आहे. लोकशाही आणि महाराष्ट्राची अस्मिता वाचवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी राहा. आपण इतिहास घडवूच, असे संजय राऊत म्हणाले.

शिरूरची चिंता मिटली : शरद पवारशरद पवार म्हणाले की, आमदार विलास लांडे यांच्या कंपनीत तीन हजार कामगार काम करीत आहेत, असे आताच त्यांनी सांगितले. हे ऐकून आता माझी ‘शिरूर लोकसभे’ची चिंता मिटली आहे. शिरूरसाठी डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागे कोणीतरी पाहिजे होता. तो मला मिळाला आहे. सुप्रिया सुळेंना राज्यसभेत पाठवायचा निर्णय घेतला, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांचा शिवसैनिक शब्दाला पक्का आहे. समाजाचा विचार करणारे जे खासदार-आमदार होते, त्यात गजानन बाबर होते. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाचा खासदार, आमदार आला तर पक्ष न पाहता आम्ही काम करायचो, हे राजकीय समीकरण होते; मात्र आता हे चित्र बदलले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार