शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Maharashtra Weather : राज्यात पुढील तीन दिवस राहणार थंडीचा कडाका

By श्रीकिशन काळे | Updated: January 7, 2025 19:29 IST

मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले

पुणे : सध्या राज्यामध्ये पुढील तीन दिवस थंडीचे राहणार आहेत. शुक्रवार (दि.१०) पर्यंत माफक थंडीचा अनुभव मुंबईसह संपूर्ण कोकण व महाराष्ट्रात जाणवेल. मंगळवारी (दि.७) मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे. मुंबई सांताक्रूझ येथे तर किमान तापमान सरासरीच्या २ डिग्री खालावून १५.२ डिग्री सेल्सिअस ग्रेड होते, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमान किंचित वाढले होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा १० अंशावर गेला होता. मंगळवारी राज्यात केवळ जळगाव येथे पारा १० अंशाच्या खाली ८.८ वर नोंदवला गेला. इतर ठिकाणी १० अंशाच्या वर पारा नोंदवला गेला. पुढील तीन दिवस थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवार (दि.११) पासून मात्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कदाचित काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, असेही खुळे यांनी सांगितले.महाराष्ट्रावर हलके हवेचे उच्च दाब क्षेत्रही तयार झालेले आहे. त्यामुळे घड्याळाचा काटा फिरतो त्या दिशेप्रमाणे हवेच्या उच्चदाब क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून बाहेर फेकल्याप्रमाणे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचे (अँटीसायक्लोनिक विंड) क्लॉकवाईज पद्धतीने गोलाकार वहन होत आहे. उत्तर-अर्धभारतात अगोदरच मार्गस्थ होऊन गेलेल्या पश्चिमी वाऱ्यातून तेथे पाऊस पडत आहे.तसेच उत्तर भारतात समुद्रसपाटीपासून दहा ते बारा किमी. उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २६० किमी वेगाने प्रवाही झोताचे 'पश्चिमी' वारे वाहत आहे. त्यामुळे एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजून ३ दिवस कायम राहील.  परंतु शनिवार दि.११ जानेवारीपासून हा झोत पूर्वेकडे सरकणार असल्यामुळे बंगाल उपसागरातून ही वारे रहाटगाडगे पद्धतीने पाणी उचलावे तशी आर्द्रता महाराष्ट्रावर घेऊन येतील. त्यामुळे काहीसे ढगाळ वातावरण महाराष्ट्रात जाणवेल. त्यामुळे शनिवार दि.११ जानेवारी पासून पुन्हा थंडीचा प्रभाव कमी होईल, असे खुळे म्हणाले. राज्यातील किमान तापमानपुणे : १२.७नगर : १२.४जळगाव : ८.८महाबळेश्वर : १४.०सातारा : १३.९मुंबई : १८.६परभणी : १३.५अकोला : १४.४गोंदिया : १३.२नागपूर : १३.७

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडweatherहवामानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनSummer Specialसमर स्पेशलRainपाऊस